आयआरएफ आणि नाईक विरोधात गुन्हा दाखल
By Admin | Updated: December 31, 2016 03:11 IST2016-12-31T03:11:32+5:302016-12-31T03:11:32+5:30
बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी वादग्रस्त मुस्लिम धर्मगुरू झाकीर नाईक आणि त्यांची संस्था इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन (आयआरएफ) संस्थेविरोधात अंमलबजावणी

आयआरएफ आणि नाईक विरोधात गुन्हा दाखल
मुंबई : बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी वादग्रस्त मुस्लिम धर्मगुरू झाकीर नाईक आणि त्यांची संस्था इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन (आयआरएफ) संस्थेविरोधात अंमलबजावणी संचलनालयाने शुक्रवारी गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे नाईक यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
बांगलादेशात झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील अतिरेकी हा झाकीर नाईकच्या भाषणांनी प्रभावित होता. त्यामुळे बांगलादेशात झाकीर नाईकच्या पीस टीव्हीवर बंदी घालण्यात आली. याशिवाय भारतातही हे चॅनेल बंद करण्यात आले. त्यांच्या भाषणांतून मुस्लिम तरूणांना दहशतवादासाठी प्रोत्साहीत करत असल्याचे आरोप, तक्रारी होत होत्या. चौकशीअंंती केंद्रीय मंत्रिमंडळाने या संस्थेवर बंदी घालण्याचा निर्णय जाहीर केला. मुंबई पोलिसांसह एनआयए, एटीएस, ईडी या तपास यंत्रणा नाईक यांच्या संस्थेच्या हालचालींवर नजर ठेऊन आहेत.
एनआयएने याप्रकरणी युएपीए कलम ३ आणि ४ अंतर्गत गुन्हा दाखल करत संस्थेच्या कार्यालयांवर छापे टाकले होते. संस्थेच्या आर्थिक व्यवहारसह नाईक यांच्या भाषणांच्या प्रती, महत्वाची कागदपत्रे, दस्तऐवज, आणि अन्य पुरावे तपास यंत्रणांनी गोळा करण्यास सुरूवात केली आहे. ईडीने झाकीर नाईक आणि आयआरएफ विरोधारत पीएमएलए कलम ३ आणि ४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांतर्गत कोट्यावधी रुपायांच्या आर्थिक व्यवहार, संस्थेला आलेले फंड, केलेला खर्च या बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी चौकशी होणार आहे. झाकीर नाईक आणि आयआरएफच्या विविध बँक खात्यांचा आणि आर्थिक व्यवहारांचा तपास ईडीकडून करण्यात येत आहे.