दगडात देव शोधताना..

By Admin | Updated: May 25, 2014 19:55 IST2014-05-25T19:53:30+5:302014-05-25T19:55:03+5:30

अकोल्याच्या कांचन शेट्ये यांच्या २११ शिल्पाकृतीची नोंद ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये झाली आहे.

Finding God in a stone .. | दगडात देव शोधताना..

दगडात देव शोधताना..

राम देशपांडे /अकोला

अभिजात कल्पनेच्या बळावर अकोल्याच्या कांचन शेट्ये यांनी पाषाणातून साकारलेल्या २११ गणरायांच्या शिल्पाकृतीची नोंद  इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये करण्यात आली असून, हा विक्रम करणार्‍या त्या महाराष्ट्रातील एकमेव शिल्पकार ठरल्या आहेत. मुलांचा सांभाळ करीत गृहिणी म्हणून संसार सांभाळताना पती गजानन शेट्ये यांनी कांचनताईंना त्यांचा छंद जोपासण्यास चालना दिली. लहानपणापासूनच कांचनताईंना पेन्सिल ड्रॉईंगसह रंगकाम करून ग्रीटिंग कार्ड व रांगोळी काढण्याचादेखील छंद होता. कांचनताईंना रेतीचे ढिगारे नेहमी आकर्षित करतात. त्यातून विविध आकाराचे दगड गोळा करणे, ते धुवून, पुसून रंगवून त्यातून नवनवी शिल्पाकृतींना जन्म देणे, हा कांचनताईंचा आवडता छंद. या कलेच्या माध्यमातून गेल्या वीस वर्षांत त्यांनी गणपतीच्या २११ कलाकृती साकारल्या आहेत. याशिवाय पक्षी, राधाकृष्ण, साईबाबा, लक्ष्मीनारायण, राम सेतू अशा विविध शिल्पाकृती साकारल्या आहेत. नुकतेच पाषाणातून साकारलेल्या २११ गणरायांच्या शिल्पाकृतीची नोंद ह्यइंडिया बुक ऑफ रेकॉर्डह्णमध्ये करण्यात आली. हा विक्रम करणार्‍या त्या महाराष्ट्रातील एकमेव शिल्पकार आहेत. या कामगिरीबाबत इंडिया बुक ऑफ रेकॉर्डतर्फे त्यांना नुकतेच शिल्ड व सन्मानपत्र बहाल करून सन्मानित करण्यात आले आहे.

Web Title: Finding God in a stone ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.