शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: नगरपरिषदेत चुरशीची लढाई: ठाकरेंच्या शिवसेनेने खाते उघडले, काँग्रेसही आघाडीवर; पहा लेटेस्ट अपडेट
2
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
3
Nagar Parishad Election Result: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
4
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
5
नात्याला काळीमा! विमा पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
6
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
7
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
8
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
9
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
10
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
11
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
12
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
13
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
14
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
15
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
16
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
17
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
18
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
19
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
20
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

जाणून घ्या, ‘मिशन बिगिन अगेन’च्या पुढच्या टप्प्यात काय सुरू अन् काय बंद?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2020 21:52 IST

काही सवलतींमध्ये वाढ करत राज्यातील मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्स काही अटींच्या अधीन राहून 5 ऑगस्ट 2020 पासून सुरू करण्यास संमती देण्यात आली आहे. 

मुंबई : कोरोनानं देशात थैमान घातलेलं असून, त्याची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन वाढवण्यात आला  आहे. लॉकडाऊनचा कालावधी ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत वाढवण्यात आला असून, मिशन बिगिन अगेन अंतर्गत टप्प्याटप्प्याने निर्बंध उठवण्यासाठी नियमावलीही जाहीर करण्यात आली आहे. काही सवलतींमध्ये वाढ करत राज्यातील मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्स काही अटींच्या अधीन राहून 5 ऑगस्ट 2020 पासून सुरू करण्यास संमती देण्यात आली आहे. 

सर्व सरकारी कार्यालये (अत्यावश्यक सेवा, आरोग्य आणि वैद्यकीय, कोषागारे, आपत्ती व्यवस्थापन, पोलीस, एनआयसी, अन्न आणि नागरी पुरवठा, एफसीआय, एनवायके, महापालिका सेवा यांना वगळून) १५ टक्के कर्मचारी किंवा १५ कर्मचारी यापैकी जे जास्त असेल तितक्या क्षमतेसह सुरु राहतील. सर्व खासगी कार्यालये ही १० टक्के कर्मचारी किंवा १० कर्मचारी यापैकी जे जास्त असेल तितक्या क्षमतेसह सुरु राहतील. स्वयंरोजगाराशी संबंधित व्यवसाय उदा.  प्लंबर, इलेक्ट्रिशियन, कीटक-नियंत्रण (पेस्ट कंट्रोल) आणि तंत्रज्ञ यांची कामे सुरु राहतील.जाणून घ्या काय सुरू राहणार आणि काय बंद?

  • आदेशापूर्वी संमती देण्यात आलेली सर्व अत्यावश्यक दुकाने खुली राहतील.
  • अत्यावश्यक नसलेली दुकाने सुरु ठेवण्यास ३१ मे, ४ जून आणि २९ जून रोजीच्या आदेशांमधील शिथिलता आणि मार्गदर्शिकेनुसार तसेच संबंधीत महापालिकेने निश्चित केलेल्या धोरणाच्या अधीन राहून संमती देण्यात येत आहे.
  • अत्यावश्यक नसलेल्या वस्तुंचे मार्केटस्, मार्केट क्षेत्र आणि दुकाने ही सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत खुली राहतील. मद्याची दुकाने ही संमती देण्यात आली असल्यास किंवा होम डिलीव्हरी (घरपोच सेवा) सुरु राहील.
  • ऑगस्ट २०२० पासून सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्सेस सुरु राहतील. तथापी, याठिकाणी असणारे थिएटर्स, फूड कोर्टस्, रेस्टॉरंटस् यांना सुरु करण्यास संमती नसेल. तथापि, या मॉल्समधील रेस्टॉरंट आणि फूड कोर्टसमधील किचनला होम डिलीव्हरी (मोठ्या वाहनांमार्फत (अग्रेगेटर्स) घरपोच सुविधा) देण्यासाठी सुरु ठेवण्यास संमती असेल.    
  • अत्यावश्यक तसेच अत्यावश्यक नसलेल्या वस्तु व साहित्यांच्या ऑनलाईन खरेदीसाठी ई-कॉमर्स व्यवस्था सुरु राहील.
  • सध्या सुरु असलेले उद्योग सुरु राहतील. संमती देण्यात आलेली सर्व सार्वजनिक तसेच खाजगी बांधकामे सुरु राहतील. संमती देण्यात आलेली सर्व मान्सुनपूर्व सार्वजनिक तसेच खाजगी कामे सुरु राहतील.
  • होम डिलीव्हरी (घरपोच सेवा) रेस्टॉरन्ट्स आणि किचन (स्वयंपाकगृहे) सुरु राहतील.
  • ऑनलाईन दूरशिक्षण आणि त्याच्याशी संबंधीत कामे सुरु राहतील. 
  • सर्व सरकारी कार्यालये (अत्यावश्यक सेवा, आरोग्य आणि वैद्यकीय, कोषागारे, आपत्ती व्यवस्थापन, पोलीस, एनआयसी, अन्न आणि नागरी पुरवठा, एफसीआय, एनवायके, महापालिका सेवा यांना वगळून) १५ टक्के कर्मचारी किंवा १५ कर्मचारी यापैकी जे जास्त असेल तितक्या क्षमतेसह सुरु राहतील.
  • सर्व खासगी कार्यालये ही १० टक्के कर्मचारी किंवा १० कर्मचारी यापैकी जे जास्त असेल तितक्या क्षमतेसह सुरु राहतील.
  • स्वयंरोजगाराशी संबंधित व्यवसाय उदा.  प्लंबर, इलेक्ट्रिशियन, कीटक-नियंत्रण (पेस्ट कंट्रोल) आणि तंत्रज्ञ यांची कामे सुरु राहतील.
  • गॅरेजेस, वर्कशॉपमधील कामे नियोजित वेळ घेऊन पूर्वसंमतीसह सुरु ठेवता येतील.
  • मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) अंतर्गत महानगरपालिका क्षेत्रात अत्यावश्यक कामांसाठी तसेच कार्यालयीन कामासाठी अंतर्गत वाहतुकीस परवानगी असेल.  लोकांनी खरेदीसाठी फक्त जवळपास/ शेजारच्या बाजारपेठामध्ये जाणे अपेक्षित आहे. अनावश्यक वस्तू खरेदीसाठी लांब पल्ल्याच्या प्रवासांना परवानगी दिली जाणार नाही.
  • 23 जून 2020 च्या आदेशानुसार मोकळ्या जागा, लॉन, वातानुकूलित नसलेल्या हॉलमध्ये लग्नाशी संबंधित कार्यक्रमांना परवानगी राहील.
  • काही निर्बंधांसह मोकळ्या भागात शारीरिक व्यायामांना (फिजिकल अॅक्टिव्हिटी) परवानगी राहील.
  • वर्तमानपत्रांचे मुद्रण व वितरण व त्यांचे घरपोच सेवा (होम डिलिव्हरी) यांना संमती असेल.
  • शैक्षणिक संस्था (विद्यापीठे/महाविद्यालय/शाळा) मधील कार्यालये, कर्मचाऱ्यांना  ई-सामग्रीचा विकास, उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन आणि निकाल जाहीर करणे आदी कामांसारख्या अशैक्षणिक कामांसाठी परवानगी असेल.
  • राज्य शासनाने परवानगी दिलेली केशकर्तनालये, स्पा, सलून, ब्यूटी पार्लर यांना २५ जून २०२० रोजीच्या शासन  आदेशातील निर्बंधांच्या अधीन राहून संमती असेल.
  • गोल्फ कोर्सेस, आऊटडोअर फायरिंग रेंज, आऊटडोअर जिम्नॅस्टीक, आऊटडोअर बॅडमिंटन आणि मल्लखांब अशा सांघिक नसलेल्या खेळांना ५ ऑगस्ट २०२० पासून संमती असेल. यात शारीरीक अंतर, स्वच्छतेची काळजी घेणे आवश्यक आहे. जलतरण तलावाला (स्विमींग पुल) परवानगी नसेल.
  • टॅक्सी, कॅब, ॲग्रीगेटर यांना फक्त अत्यावश्यक सेवेसाठी १ अधिक ३ या प्रवासी क्षमतेनुसार, रिक्षा फक्त अत्यावश्यक सेवेसाठी १ अधिक २ या प्रवासी क्षमतेनुसार, चारचाकी फक्त अत्यावश्यक सेवेसाठी १ अधिक ३ या प्रवासी क्षमतेनुसार तर दुचाकी फक्त अत्यावश्यक सेवेसाठी १ अधिक १ प्रवासी क्षमतेनुसार (हेल्मेट आणि मास्कसह) चालवण्याची परवानगी राहील.
  • कोणत्याही विशिष्ट / सामान्य आदेशाद्वारे परवानगी दिलेली अन्य कोणतीही कामे यांना संमती असेल.
  • उर्वरित राज्यभरात पुढील बाबींना वेळोवळी निर्गमित केलेल्या अटी-शर्तींवर परवानगी देण्यात आली आहे.
  • या आदेशापूर्वी संमती देण्यात आलेली सर्व अत्यावश्यक दुकाने खुली राहतील.
  •  जिल्हाअंतर्गत बस वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे. बसमध्ये एकूण प्रवासी क्षमतेच्या 50 टक्के प्रवासी सामाजिक अंतर आणि सुरक्षेची काळजी घेऊन प्रवास करू शकतील.
  • आंतरजिल्हा प्रवास नियंत्रित स्वरुपाचा राहील.
  • अत्यावश्यक नसलेली मार्केटस्, दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरू राहतील.
  • मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्सेस ही ५ ऑगस्ट २०२० पासून सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत खुली राहू शकतील. त्यातील थिएटर्स, फूड कोर्टस्, रेस्टॉरंटस् यांना संमती नसेल. तथापि, रेस्टॉरंट आणि फूड कोर्टसमधील किचनला होम डिलीव्हरी (घरपोच सेवा) देण्यासाठी सुरु ठेवण्यास संमती असेल. संबंधित नागरी किंवा ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था याबाबत नियमावली (स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर) ठरवून देतील.
  • खुल्या जागा, लॉन्स आणि वातानुकूलित नसणाऱ्या सभागृहातील विवाह सोहळ्यासाठी २३ जून २०२० च्या निर्णयानुसार परवानगी असेल. निर्बंधासह खुल्या जागेतील व्यायाम व इतर शारीरिक हालचाली यांना संमती असेल.
  • छपाई आणि वृत्तपत्रांच्या घरपोच वितरणास परवानगी असेल. विद्यापीठे/महाविद्यालये/शाळा यांची कार्यालये आणि शैक्षणिक संस्थांचे अशैक्षणिक   कामांसाठी असणारे कर्मचारी यांना ई कंटेट तयार करणे, उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन करणे. परीक्षेचे निकाल घोषित करण्यासाठी परवानगी असेल संशोधक आणि शास्त्रज्ञ यांना उपस्थित राहण्यास परवानगी राहिल.
  • केशकर्तनालये, स्पा, सलून्स, ब्युटी पार्लर्स यांना दि. २५ जून २०२० रोजीच्या शासन आदेशानुसार काही अटींवर परवानगी.
  • गोल्फ कोर्सेस, आऊटडोअर फायरिंग रेंज, आऊटडोअर जिम्नॅस्टीक, आऊटडोअर बॅडमिंटन आणि मल्लखांब अशा सांघिक नसलेल्या खेळांना ५ ऑगस्ट २०२० पासून संमती असेल. यात शारिरीक अंतर, स्वच्छतेची काळजी घेणे आवश्यक आहे. जलतरण तलावाला (स्विमींग पुल) परवानगी नसेल.
  • सार्वजनिक आणि खाजगी वाहनांमध्ये प्रवाशांना प्रवास करण्याची परवानगी असेल. दुचाकीमध्ये हेल्मेट आणि मास्कसह १ अधिक १ प्रवासी, तीन चाकी वाहनामध्ये चालक आणि २ प्रवासी तर चार चाकी वाहनामध्ये चालक आणि ३ प्रवासी फक्त अत्यावश्यक कामासाठी प्रवास करु शकतील. प्रवासात मास्क परिधान करणे अनिवार्य असेल.
  • याशिवाय ज्या बाबींना परवानगी देण्यात आलेल्या असतील त्या बाबी.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस