शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
2
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
3
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
4
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
5
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
6
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
7
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
8
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
9
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
10
Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी
11
बापरे! १ कोटींची लॉटरी लागली, पण विजेता काही केल्या समोर येईना; कंपनीला सुचली 'अशी' आयडिया
12
दिल्लीच्या प्रदूषणामुळे 'या' ५ कंपन्यांचे शेअर झाले हॉट! Air Purifier ची मागणी वाढल्याने गुंतवणूकदारांचे लक्ष
13
Decision Making: निर्णय घेताना द्विधा मनःस्थिती होते? सद्गुरु सांगतात, 'या' पाच मार्गाने घ्या मनाचा कौल!
14
कॉलेज तरुणीने उबर बुक केली...! अपघात झाला अन् ड्रायव्हर पळाला; आईने कंपनीला तीन प्रश्न विचारले...
15
Delhi Red Fort Blast : अल फलाह विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत आरडीएक्स तयार केले होते? ८०० पोलिस आणि एनआयए तपास करणार
16
बाजारात 'रिकव्हरी'चा वेग! महिंद्रा-अदाणी कंपनीचे शेअर्स सुस्साट! टाटा-बजाज आपटले
17
दिल्ली स्फोट: दुसऱ्या दिवशी सकाळी झाडावर लटकलेला मृतदेह सापडला; मृतांचा आकडा १० वर...
18
"मी २०३० मध्ये IAS होऊनच...", कुटुंबाचा लग्नासाठी दबाव, ९२% मिळालेल्या टॉपरने सोडलं घर
19
सुझलॉन एनर्जीचे शेअर्स ३०% घसरले! गुंतवणूकदारांनी काय करावं? ब्रोकरेज फर्मने दिलं रेटींग
20
Delhi Red Fort Blast : दिल्ली स्फोट प्रकरणात देवेंद्र आणि दिनेश कनेक्शन; कोण आहेत 'ही' दोन नावं?

एपीएमसी मार्केटला गुन्हेगारांचा विळखा

By admin | Updated: August 15, 2016 03:39 IST

आशिया खंडातील सर्वात मोठी सहकारी बाजारपेठ असणाऱ्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीला गुन्हेगारांचा विळखा पडला

नामदेव मोरे,

नवी मुंबई- आशिया खंडातील सर्वात मोठी सहकारी बाजारपेठ असणाऱ्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीला गुन्हेगारांचा विळखा पडला आहे. गांजा, गुटखा, दारूच्या अवैध विक्रीसह खंडणी, चोरी, खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी सापडले आहेत. आतापर्यंत बांगलादेशी नागरिकांचे आश्रयस्थान असलेल्या मार्केटमध्ये जानेवारी २०१४ मध्ये हिजबुल मुजाहिदीनचा अतिरेकीही सापडला होता. परंतु यानंतरही येथील सुरक्षा व्यवस्थेमध्ये व प्रशासनाच्या गलथान कारभारामध्ये काहीही फरक पडलेला नाही. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये वर्षाला १५ हजार कोटी रूपयांची उलाढाल होते. एक लाख नागरिकांना प्रत्यक्ष व ५ लाख नागरिकांना अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध झाला आहे. देशाच्या प्रत्येक राज्यातून व विदेशातून कृषी माल या मार्केटमध्ये विक्रीसाठी येतो. आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळख व रोज होणारी करोडो रूपयांची उलाढाल यामुळे एपीएमसीवर गुन्हेगारी टोळ्यांनीही लक्ष केंद्रित केले आहे. नवी मुंबईमध्ये गांजा विक्रीचे सर्वात मोठे रॅकेट मार्केटमध्ये सुरू आहे. राजा, दत्तात्रय विधाते, पप्पू , राकेश यादव असे अनेक गांजा विक्रेते थेट मार्केटमध्ये विक्री करत आहेत. महाराष्ट्रामध्ये सर्वत्र गुटखा विक्री असली तरी एपीएमसीच्या प्रत्येक टपरीवर माणिकचंदसह सर्व प्रकारचा गुटखा सहजपणे उपलब्ध असतो. भाजी मार्केट व विस्तारीत भाजी मार्केटच्या मधील रोडवर रोज पहाटे राकेश व त्याचे इतर तीन भाऊ हे बिनधास्तपणे गुटखा विकत असतात. एक भाऊ दारूविक्री करत असून उर्वरित येथे इतर व्यवसाय करणाऱ्यांकडून पैसे वसुलीचे काम करत आहेत. फळ मार्केटमध्ये टेंपोमध्ये जुगाराचे अड्डे सुरू आहेत. चोरी, खून, दरोडे, बनावट नोटा व इतर गंभीर गुन्ह्यांमधील आरोपींना अनेक वेळा मार्केटमधून अटक केली आहे. बाजार समितीच्या फळ व भाजी मार्केटला धर्मशाळेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. बांगलादेशी नागरिकांचे सर्वात मोठे आश्रयस्थान म्हणूनही एपीएमसी मार्केटची ओळख झाली आहे. पश्चिम बंगालमधून बांगलादेशी येथे कामानिमित्त येत आहेत. २००६ पासून जवळपास ४०० बांगलादेशी नागरिकांना मार्केटमधून अटक केली आहे. भरत शेळके एपीएमसीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक असताना एकाच वेळी १०० पेक्षा जास्त बांगलादेशी अटक केली होती. तीन महिन्यापूर्वीही येथून १४ बांगादेशींना अटक केली आहे. २०१२ मध्ये मुंबईमध्ये बनावट नोटा चलनात आणणारी टोळी अटक केली होती. ही टोळी एपीएमसीच्या फळ मार्केटमध्ये नकली नोटा देवून फळ खरेदी करत असल्याचे तपासात स्पष्ट झाले होते. परंतु यानंतर विनापरवाना वास्तव्य करणाऱ्या परप्रांतीय कामगारांविरोधात काहीही ठोस कारवाई केली जात नाही. गुन्हेगारांनी मार्केटमध्ये आश्रय घेण्यास सुरवात केली असल्यामुळे एपीएमसीबरोबर देशाच्या सुरक्षेविषयी प्रश्नचिन्ह आहे. अतिरेक्यांनी हल्ला केल्यानंतर प्रशासन जागे होणार का असा प्रश्नही दक्ष नागरिक विचारत आहेत. >बनावट तेल ते चंदन तस्कर१९ आॅक्टोबर २००६ मध्ये मसाला मार्केटमध्ये गोदरेजचा लोगो बनावट तेलाच्या बॉटलवर लावून विक्री करणारी टोळी पकडली होती. पाच जणांना अटक करून ३०० लिटर तेल जप्त केले होते. ९ डिसेंबर २०१३ मध्ये अल्पवयीन मुलीला पळवून नेणारा नुरमोहम्मद शेख हाही एपीएमसीमध्येच कार्यरत असल्याचे तपासात स्पष्ट झाले होते. याशिवाय २७ नोव्हेंबर २०१४ मध्ये ५ कोटी रूपयांचे चंदन सापडले होते. मे २०१६ मध्ये गुजरात पोलिसांनी ट्रक चोरी करणारे आरोपी अटक करून २९ ट्रक जप्त केले होते. या आरोपींचेही एपीएमसी कनेक्शन उघड झाले होते.