शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

अखेर डीजीपींच्या निवडीसाठीचा प्रस्ताव पुन्हा यूपीएससीकडे, राज्य सरकारकडून चौथ्यांदा प्रस्ताव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2021 08:30 IST

DGP : सात महिन्यांपासून पोलीस महासंचालक (डीजीपी) पदाचा अतिरिक्त कार्यभार ३ अधिकाऱ्यांकडे देण्यात आला आहे. गेल्या ४ महिन्यांपासून संजय पांडे यांच्याकडे पदभार आहे.

- जमीर काझी

मुंबई : महाराष्ट्र पोलीस दलात पूर्णवेळ प्रमुखाची निवड करण्यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या निवड समितीकडे राज्य सरकारकडून नुकताच नव्याने प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. गेल्या ५ महिन्यांत विविध दुरुस्त्या करून तो चौथ्यांदा पाठविला आहे.सात महिन्यांपासून पोलीस महासंचालक (डीजीपी) पदाचा अतिरिक्त कार्यभार ३ अधिकाऱ्यांकडे देण्यात आला आहे. गेल्या ४ महिन्यांपासून संजय पांडे यांच्याकडे पदभार आहे. यूपीएससीकडून होणाऱ्या नियुक्तीवरच त्यांचे भवितव्य अवलंबून आहे. प्रस्तावातील १९ वरिष्ठ अधिकाऱ्यांपैकी त्यांनी सुचविलेल्या ३ जणांच्या यादीत त्यांचे नाव असल्यास त्यांना या पदावर काम करता येईल. अन्यथा सरकारला अन्य अधिकाऱ्यांची निवड करावी लागेल.पोलीस महासंचालक सुबोध जायसवाल यांची केंद्रात प्रतिनियुक्ती झाल्याने ७ जानेवारीला त्यांचा तात्पुरता पदभार तत्कालीन ‘एल अँड टी’चे प्रमुख हेमंत नगराळे यांच्याकडे सोपविला होता. त्यानंतर युपीएससीकडे नियुक्तीबाबतचा प्रस्ताव पाठविण्यापूर्वींच उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ मिळालेल्या स्काॅर्पिओतील जिलेटिन कांड्यांच्या घटनेमुळे पोलीस दलात ‘ट्रान्स्फर स्फोट’ झाला. त्यानंतर मुंबईचे तत्कालीन आयुक्त परमबीर सिंग यांची उचलबांगडी करून नगराळे यांची त्यांच्याजागी निवड केली, तर एसीबीचे प्रमुख रजनीश सेठ यांच्याकडे डीजीपीचा अतिरिक्त कार्यभार दिला. त्याबाबतचा प्रस्ताव यूपीएससीकडे पाठविला होता. मात्र पांडे यांनी, डावलल्याबद्दल कोर्टात जाण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे सरकारने ९ एप्रिलला त्यांच्याकडे अतिरिक्त पदभार सोपविला. या सर्व घडामोडीनंतर राज्य सरकारने मेमध्ये पाठविलेल्या प्रस्तावात जायसवाल व रश्मी शुक्ला यांची नावे नसल्याबद्दल खुलासा विचारला. त्यानंतर पुन्हा नगराळे यांच्याबद्दल व अन्य काही त्रुटींबद्दलची माहिती मागविली. त्यानंतर ३० वर्षे सेवा झालेल्या सर्व अधिकाऱ्यांची नावे पाठविण्याची सूचना केली होती. त्यानुसार काही दिवसांपूर्वी पुन्हा १९९१ पर्यंतच्या आयपीएस बॅचच्या अधिकाऱ्यांचा अद्ययावत प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.

पांडे यांच्या नावावर एकदा फुलीसुबोध जायसवाल यांची फेब्रुवारी २०१९ मध्ये डीजीपीच्या नियुक्तीवेळी तत्कालीन फडणवीस सरकारने पाठविलेल्या प्रस्तावावेळी यूपीएससीने संजय पांडे यांना वगळून अन्य तीन नावांना पसंती दिली होती. त्यामुळे आता निवड समिती काय निर्णय घेते, त्यांना पुन्हा वगळते का, याकडे लक्ष लागून राहिले आहे. 

टॅग्स :Policeपोलिस