शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
2
पकडले जाण्याच्या भीतीने उमरने उडवली स्फोटकांनी भरलेली कार; पुलवामा हल्ल्याच्या दिवशी विकली गाडी
3
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
4
आजचे राशीभविष्य, ११ नोव्हेंबर २०२५: कामे नक्की पूर्ण होतील, पण 'या' राशीने आळस टाळा !
5
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
6
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
7
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी
8
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
9
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
10
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
11
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
12
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
13
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका
14
निवड समितीसोबतचा पंगा मोहम्मद शमीला भोवणार? कसोटी संघातील पुनरागमन अनिश्चित काळ लांबणीवर जाण्याची शक्यता
15
कंपनीला कर्मचाऱ्यांनीच घातला दीड कोटीचा गंडा, बनावट कॅश व्हाऊचरची छपाई, अतिरिक्त पगार
16
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
17
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
18
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
19
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
20
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल

Police Recruitment 2019 : बहुप्रतीक्षित पोलीस भरती जाहीर : राज्यात महापोर्टलद्वारे प्रथमच होणार भरती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2019 10:50 IST

Jobs in Police Department: राज्यातील सर्व जिल्ह्यातील सर्व आयुक्तालय पोलीस परीक्षेत्रामध्ये ही भरतीप्रक्रिया सुरू होणार आहे...

ठळक मुद्दे३ सप्टेंबरपासून ऑनलाईन अर्ज स्वीकारणार :२३ सप्टेंबर अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख उत्तीर्ण उमेदवारच मैदानी परीक्षेसाठी पात्र

बारामती : अखेर बहुप्रतीक्षित पोलीस भरती एकदाची जाहीर झाली आहे. भरतीप्रक्रियेसाठी ३ सप्टेंबरपासून ऑनलाईन अर्ज स्वीकारणार आहेत. तर २३ सप्टेंबर अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख ठेवली आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यातील सर्व आयुक्तालय पोलीस परीक्षेत्रामध्ये ही भरतीप्रक्रिया सुरू होणार आहे. गृहविभागाने मोठे  अभूतपूर्व बदल केल्यानंतर, तसेच महापोर्टलद्वारे राज्यात होणारी ही पहिली भरती प्रक्रिया आहे.गृहविभागाने पोलीस भरती परीक्षेत  मोठे बदल केले आहेत. यापूर्वी मैदानी चाचणी अगोदर घेतली जात असे. उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारालाच लेखी परीक्षेला पात्र ठरवले जात असे. मात्र, नवीन निर्णयानुसार पोलीस भरतीसाठी पहिल्यांदा लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. ही लेखी परीक्षा पूर्वीप्रमाणेच  ९० मिनिटांची १०० गुणांची घेतली जाणार आहे. यामध्ये परीक्षेची वेळ, परीक्षेचे घटक ‘जैसे थे’ ठेवण्यात आले आहेत. सामान्यज्ञान, चालू घडामोडी, अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण या चार घटकांचा समावेश आहे. लेखी परीक्षेत खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना किमान ३५ टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. मागास प्रवर्गातील उमेदवारांना ३३ टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. लेखी परीक्षेतून एका जागेसाठी १० याप्रमाणे मैदानी चाचणीची संधी दिली जाणार आहे. मैदानी चाचणी परीक्षेतदेखील अभूतपूर्व बदल केले आहेत. त्यानुसार मुलांची १०० गुणांची मैदानी चाचणी ५० गुणांवर आणली आहे. तसेच मुलांच्या चाचणीतून लांबउडी, पूलअप्स काढले आहेत. मुलांसाठी ठेवलेल्या ५० गुणांच्या मैदानी परीक्षेत ३० गुणांसाठी १६०० मीटर धावणे, १० गुणांसाठी १०० मीटर धावणे, गोळाफेकसाठी १० गुणांचा समावेश आहे, तर  मुलींसाठी ठेवलेल्या मैदानी परीक्षेत मुलींना ८०० मीटर धावणेसाठी ३० गुण, १०० मीटर धावणे १० गुण, गोळाफेक १० गुण ठेवण्यात आले आहेत. अशा प्रकारे लेखी परीक्षेतील १०० गुण आणि मैदानी चाचणीतील ५० गुण अशा एकूण १५० गुणांतून उमेदवाराची निवड केली जाणार आहे.विशेष बाब म्हणजे  राज्य राखीव पोलीस दल (एसआरपीएफ ) व भारत राखीव बटालियन (आयआरबी) या पदांसाठी मात्र १०० गुणांची मैदानी चाचणी घेतली जाणार आहे. यामध्ये ५  किलोमीटर धावणे, १०० मीटर धावणे या प्रकारांचा समावेश आहे. १०० गुण लेखी परीक्षेसाठी व १०० गुण मैदानी चाचणीसाठी अशा २०० गुणांतून एसआरपीएफ आणि आयआरबीच्या  पदांसाठी निवड करण्यात येणार आहे...........उत्तीर्ण उमेदवारच मैदानी परीक्षेसाठी पात्रराज्यात २०१९ मध्ये होणाऱ्या पोलीस शिपाई भरती प्रक्रियेमध्ये गृह विभागाने मोठे अभूतपूर्व बदल केले आहेत. त्यानुसार ही परीक्षा होणार आहे. यामध्ये आता भरतीसाठी इच्छुक उमेदवारांची प्रथम लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. यामध्ये उत्तीर्ण झालेला उमेदवारच मैदानी परीक्षेसाठी पात्र ठरणार आहे. नव्या निर्णयानुसार पोलीस शिपाई सेवा प्रवेश २०१२ मध्ये सुधारणा करण्यात आली आहे.........२००६ पासून नियमितपणे पोलीस भरती प्रक्रिया होत आहे. मात्र, यंदा पोलीस भरती प्रक्रिया जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये नेहमी आढळणारा उत्साह यंदा दिसून येत नाही. याचे कारण म्हणजे ही परीक्षा महापोर्टलकडे देण्यात आली आहे. महापोर्टलमार्फत घेण्यात येणाºया सार्वजनिक बांधकाम, वनविभाग आदी शासकीय परीक्षांचा अनुभव पाहता विद्यार्थ्यांमध्ये अनुत्साह आहे. ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी ऑनलाईन परीक्षा होणार आहे. राज्यातून जवळपास ८ लाख उमेदवार ही परीक्षा देणार आहेत.   - उमेश रुपनवर, सह्याद्री अ‍ॅकॅडमी ..... 

टॅग्स :government jobs updateसरकारी नोकरीPoliceपोलिसGovernmentसरकार