अखेर मंत्रालयात हिरकणी कक्ष सुरू
By Admin | Updated: October 28, 2015 02:22 IST2015-10-28T02:22:10+5:302015-10-28T02:22:10+5:30
मंत्रालयात काम करणाऱ्या स्तनदा महिला कर्मचाऱ्यांसाठी हिरकणी कक्षाचा प्रारंभ आजपासून करण्यात आला. महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांनी त्यासाठी पुढाकार घेतला.

अखेर मंत्रालयात हिरकणी कक्ष सुरू
मुंबई : मंत्रालयात काम करणाऱ्या स्तनदा महिला कर्मचाऱ्यांसाठी हिरकणी कक्षाचा प्रारंभ आजपासून करण्यात आला. महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांनी त्यासाठी पुढाकार घेतला.
गृह विभागात कार्यरत माधुरी गवळी ही महिला कर्मचारी आपल्या तान्हुल्याला घेऊन मंत्रालयात यायची. तळमजल्याच्या आडोशाला पाळणा बांधून त्यात ठेवायची आणि नोकरीवर जायची. तिच्या अनुपस्थितीत सासू आणि पती बाळाला सांभाळायचे. ही बाब समोर आल्यानंतर मुंडे यांनी हिरकणी कक्ष मंत्रालयात सुरू करण्याचे आदेश दिले होते. त्याची अंमलबजावणी झाली. या सुविधेचा लाभ माधुरी बुधवारपासून घेणार आहेत. सामान्य प्रशासन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महिला बालकल्याण विभागाने हिरकणी कक्ष स्थापन करण्यासाठी हालचाली सुरू केल्या. या कालावधीत सातत्याने या विभागाकडून हिरकणी कक्षासंदर्भात पाठपुरावा करून, अखेर मंगळवारी मंत्रालयात तळमजल्यावर बेड, सोफा, पंखा, वातानुकूलित संच आणि शौचालय असलेला हिरकणी कक्ष सुरू करण्यात आला आहे. (विशेष प्रतिनिधी)