अखेर कुपोषित राहुलची मृत्युशी झुंज अयशस्वी
By Admin | Updated: September 21, 2016 14:10 IST2016-09-21T14:10:50+5:302016-09-21T14:10:50+5:30
पालघर जिल्हयाच्या जव्हार तालुक्यातील रुईघर येथील कुपोषित बालक राहुल काशिराम वाडकर याचा अखेर मृत्यू झाला.

अखेर कुपोषित राहुलची मृत्युशी झुंज अयशस्वी
जव्हार तालुक्यातील रुईघर बोपदरी येथील २ वर्षांच्या, राहुल या कुपोषित बालकाला सोमवारी पतंगशाहा कुटीर रुग्णलायात दाखल करण्यात आले होते. त्याची परिस्थिती अत्यंत नाजूक झाली होतीय त्याच्यावर वर पतंगशाहा कुटीर रुग्नालयात डॉ- रामदास मराड यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरु करण्यात आले व त्याला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते.
जव्हार तालुक्यातील रुईघर बोपदरी गावातील कु.राहुल काशीराम वाडकर हा २ वर्षांचा मुलगा, मात्र त्याचे वजन फक्त ५ किलो होते. तो गेल्या महिनाभरापासून अतिगंभीर अवस्थेत होता. त्याला उपचारांची गरज असल्याने, येथील आशा कार्यकर्त्या- संगीता किरकिरे या कार्यक्रतीने या कुपोषित बाळाला दवाखान्यात दाखल करण्यासाठी पालकांना सांगितले. मात्र जव्हार येथे रुग्णालयात रहावे लागेल म्हणून त्याची आई जंगलात जाऊन लपली होती. सोमवारपासून त्याच्यावर उपचार करण्यात येत होते, मात्र अखेर आज त्याचा मृत्यू झाला.