अखेर तपासनिसांच्या मानधनात वाढ
By Admin | Updated: April 4, 2017 03:16 IST2017-04-04T03:16:12+5:302017-04-04T03:16:12+5:30
गेल्या काही वर्षांपासून सातत्याने शिक्षक आणि मुख्याध्यापकांकडून होत असणाऱ्या मागणीला, अखेर राज्य शिक्षण मंडळाने मान्यता दिली

अखेर तपासनिसांच्या मानधनात वाढ
मुंबई : गेल्या काही वर्षांपासून सातत्याने शिक्षक आणि मुख्याध्यापकांकडून होत असणाऱ्या मागणीला, अखेर राज्य शिक्षण मंडळाने मान्यता दिली आहे. दहावी आणि बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणाऱ्या शिक्षकांच्या मानधनात वाढ करण्यात आली आहे. फेब्रुवारी, मार्च महिन्यांत झालेल्या दहावी, बारावीच्या परीक्षांच्या उत्तरपत्रिका तपासणीसाठी ५० पैसे ते २ रुपये इतकी मानधनात वाढ करण्यात आली आहे, पण मानधनातील वाढ अत्यल्प असल्याने शिक्षक, मुख्याध्यापक संघटनांनी नाराजी व्यक्त केली असून, पुढच्या वर्षी योग्य ती वाढ न मिळाल्यास, पेपर तपासणीवर बहिष्कार टाकणार असल्याचे सांगण्यात आले.
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने, दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तपासनीसांच्या मानधनात वाढ करण्याचे स्पष्ट केले आहे. फेब्रुवारी, मार्च महिन्यात झालेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांपासूनच नवीन मानधन देण्यात येईल, असे मंडळाकडून सांगण्यात आले.
दहावी परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने, शिक्षकांवर पेपर तपासण्याचा ताण वाढतो आहे, पण त्यांना मिळणारे मानधन अत्यल्प होते. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून सातत्याने शिक्षक आणि मुख्याध्यापक मानधनात वाढ करण्याची मागणी करत होते, पण मंडळातर्फे ही मागणी मान्य झालेली नव्हती, पण झालेली वाढ अत्यल्प असल्याने शिक्षक, मुख्याध्यापक संघटना नाराज झाल्या आहेत.
दहावी आणि बारावीच्या परीक्षांनंतर निकालात कोणताही गोंधळ होऊ नये, कोणत्याही प्रकारे निकाल वेळेवर लागावा, यासाठी तपानिसांना दहा दिवसांची मुदत देण्यात आली, पण दहा दिवस पूर्ण मिळत नसल्याने, पेपर तपासताना घाई होत असल्याचे तपासनिसांचे म्हणणे आहे. एका तपासनिसाला सर्वसाधारणपणे एका विषयाचे ४०० पेपर तपासावे लागतात.
नियामकांच्या मानधनातही वाढ करण्यात आली आहे. मात्र, ही वाढ फसवी असल्याचा दावा कनिष्ठ महाविद्याालयीन शिक्षक संघ महासंघाचे अनिल देशमुख यांनी केला आहे. बारावीच्या नियामकांना प्रति उत्तरपत्रिका दोन रुपये इतके सुधारित मानधन देण्यात येणार आहे. मात्र, यापूर्वी एक हजार किंवा त्यापेक्षा जास्त उत्तरपत्रिकांचे नियमन करणाऱ्या नियामकास एकरकमी २ हजार ३२५ रुपये देण्यात येत होते. ही रक्कम वाढवावी व हजार उत्तरपत्रिकांवरील प्रति उत्तरपत्रिका दोन रुपये द्यावे, अशी मागणी संघटनेतर्फे करण्यात आली होती. (प्रतिनिधी)
तपासनिसांना मिळणारे आधीचे मानधन
>परीक्षेचा दहावीबारावी
कालावधी
तीन तास४.२५५
अडीच तास३.५०३.७५
दोन तास २.५०३
दीड तास २.५०२.५०
एक तास१.७५२
तपासनिसांना मिळणारे सुधारित मानधन
>परीक्षेचा दहावीबारावी
कालावधी
तीन तास५६
अडीच तास४५
दोन तास ३४
दीड तास ३४
एक तास२३