....अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सभेच्या व्यासपिठावर
By Admin | Updated: February 18, 2017 18:44 IST2017-02-18T18:36:26+5:302017-02-18T18:44:05+5:30
महापालिका निवडणूकीच्या निमित्ताने हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा
....अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सभेच्या व्यासपिठावर
नाशिक : महापालिका निवडणूकीच्या निमित्ताने हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा भाजपाच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. सभेला गर्दीच नसल्याने शहरात पावणेपाच वाजेपासून दाखल झालेले फडणवीस यांना तब्बल तासभर प्रतिक्षा करावी लागली. अखेर फडणवीस आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांच्यासह सभेच्या व्यासपिठावर पोहचले आहेत.
भाजपाच्या कार्यकर्त्यांनी शहरातून मोठ्या वाहनांमधून नागरिकांची वाहतूक करत कान्हेरे मैदान भरण्याचा प्रयत्न केला. पदाधिकारी व कार्यकर्त्यांना काही प्रमाणात यामध्ये यश आले. सभेच्या ठिकाणी सध्या एक हजाराहून अधिक नागरिक जमल्याचा सुत्रांचा दावा.