अखेर एकनाथ खडसे झोटिंग समितीसमोर हजर
By Admin | Updated: February 14, 2017 18:11 IST2017-02-14T18:11:54+5:302017-02-14T18:11:54+5:30
भोसरी येथील जमीन गैरव्यवहाराची चौकशी करणाऱ्या न्या. झोटींग समितीसमोर अखेर माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी स्वत: उपस्थित राहून

अखेर एकनाथ खडसे झोटिंग समितीसमोर हजर
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 14 - भोसरी येथील जमीन गैरव्यवहाराची चौकशी करणाऱ्या न्या. झोटींग समितीसमोर अखेर माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी स्वत: उपस्थित राहून आपली बाजू मांडली. ह्यअॅव्हीडेन्स अॅफीडेव्हीट दाखल केले. या प्रतिज्ञापत्रावर आता सुनावणी होणार आहे. यावर समितीने २१ फेब्रुवारी रोजी पुन्हा सुनावणी ठेवली आहे.
पुणे जिल्ह्यातील भोसरी येथील जमीन पदाचा दुरुपयोग करून नातेवाईकांना दिल्याचा आरोप राज्याचे माजी महसुल मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर झाला. याप्रकरणी त्यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी न्यायमूर्ती डी. झोटींग यांची एक सदस्यीय समिती गठित केली. नागपुरातील रविभवन येथील कॉटेज क्रमांक १३ मधून झोटिंग चौकशी समितीचे कामकाज सुरू आहे. गेल्या सात महिन्यापासून ही समिती चौकशी करीत आहे. यादरम्यान
समितीने औद्योगिक विभाग आणि महसूल विभागातील अधिकाऱ्यांना उत्तर सादर करण्यासाठी बोलावण्यात आले होते. दोन्ही विभागाच्या प्रधान सचिवांनाही समिती समोर हजेरी लावली होती. या चौकशीला होत असलेल्या दिरंगाईवर मुंबई
उच्च न्यायालयाने सुुद्धा नाराजी व्यक्त करीत शासनाला चांगलेच धारेवर धरले होते. दरम्यान समितीकडून आता उलट तपासणी सुरू करण्यात आली आहे. खडसे, महसूल आणि औद्योगिक विभागाकडून आपआपला युक्तीवाद वकिलामार्फत
समितीसमोर ठेवण्यात येत आहे. या प्रकरणी खडसेंना उलट तपासणीसाठी चौकशीने नोटीस बजावली असून समितीसमोर हजर राहण्यास सांगितले होते. परंतु आजवर त्यांनी वकीलांमार्फत बाजू मांडल्याने ते स्वत: हजर होतात की नाही याकडे
सर्वांचे लक्ष लागले होते. मंगळवारी दुपारी १२ वाजता एकनाथ खडसे हे त्यांचे वकील एम.जी. भांगडे व अॅड. अमोल पाटील यांच्यासह न्या. झोटिंग समितीच्या कार्यालयात हजर झाले. तब्बल पाऊन तास त्यांनी आपली बाजू मांडली. १२.४० मिनिटांनी ते समितीच्या कार्यालयातून बाहेर पडले. मिळालेल्या माहितीनुसार खडसे यांनी आपल्या साक्षी पुराव्याचे अॅव्हीडेन्स अॅफीडेव्हीड सादर केले. यावर आता २१ फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. २१ तारखेलाही एकनाथ खडसे स्वत: उपस्थित राहणार आहेत.
बाजू मांडली, तारीख मिळाली
झोटिंग समितीच्या कार्यालयातून बाहेर पडल्यावर माजी मंत्री एकनाथ खडसे यांना लोकमतने यासंदर्भात विचारणा केली असता त्यांनी संगितले की, आम्ही आपली बाजू मांडली असून समितीने पुढची तारखी दिली आहे. पुढच्या तारखेला काय होते ते समजेल.
माजी मंत्री एकनाथ खडसे हे सुरुवातीला चौकशी समिती समोर हजर झाले नाही. आता सुनावणी पूर्ण झाल्यावर ते हजर झाले. त्यांनी अॅव्हीडेन्स अॅफीडेव्हीड सादर केले. त्यामुळे यावर पुन्हा सुनावणी होईल. त्यासाठी पुन्हा नवा ह्यफ्रेमवर्कह्ण करावा लागेल. याला वेळ लागेल. त्याचा अभ्यास करावा लागेल, म्हणून आम्ही वेळ मागितली.
अॅड. जलतारे, एमआयडीसीचे वकील
समितीला हवी चौथ्यांदा मुदतवाढ
न्या. झोटिंग समितीची मूदत १५ फेब्रुवारी रोजी संपत आहे. आतापर्यंत त्यांना तीन वेळा मुदत वाढ मिळाली आहे. समितीचे कामकाज जवळपास पूर्ण होत आले आहे. समितीला पुन्हा सहा आठवड्यांची मुदतवाढ मिळावी यासाठी शासनाला पत्र पठविण्यात आल्याची माहिती आहे.