...अखेर धनंजय मुंडे वाँटेड

By Admin | Updated: July 11, 2016 20:12 IST2016-07-11T17:58:47+5:302016-07-11T20:12:14+5:30

बीड जिल्हा बँक घोटाळा प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यात आलं असून, बँकेतील अनेक आजी-माजी संचालकांना फरार घोषित केलं आहे.

Finally, Dhananjay Munde wanted | ...अखेर धनंजय मुंडे वाँटेड

...अखेर धनंजय मुंडे वाँटेड

ऑनलाइन लोकमत,
बीड, दि. 11 - बीड जिल्हा बँक घोटाळा प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यात आलं असून, बँकेतील अनेक आजी-माजी संचालकांना वाँटेड घोषित केलं आहे. विशेष म्हणजे वाँटेड आरोपींमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचाही समावेश आहे.
आरोपपत्रात तब्बल 131 जणांची नावं टाकण्यात आली आहेत. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक करण्यासाठी छापेमारी केली. मात्र एकही आरोपी न सापडल्याने अखेर सर्व आरोपींना कोर्टातूनच वाँटेड घोषित करण्यात आलं आहे. यामध्ये धनंजय मुंडे यांच्यासह राष्ट्रवादीचे गेवराईचे आमदार अमरसिंह पंडित, काँग्रेसच्या खासदार रजनी पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांच्यासह 131 जणांना वाँटेड म्हणून घोषित करण्यात आलं आहे.
बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतून कोट्यवधी रुपयांचं विनातारण कर्ज मंजूर करणं, तसेच कागदपत्रांची खातरजमा न करता कर्ज वाटप केल्याचा आरोप या 131 जणांवर ठेवण्यात आला आहे. बीड जिल्हा बँक घोटाळ्याप्रकरणी अनेक नेत्यांवर शहर ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला होता.अखेर त्या सर्व आरोपींना वाँटेड घोषित करण्यात आलं आहे.

Web Title: Finally, Dhananjay Munde wanted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.