शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
4
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
5
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
6
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
7
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
8
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
9
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
10
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
11
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
12
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
13
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
14
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
15
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
16
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
17
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
18
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
19
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
20
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा

‘त्या’ कॉलची चौकशी अंतिम टप्प्यात

By admin | Updated: June 7, 2016 07:43 IST

माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे आणि दाऊद इब्राहिम यांच्यातील कथित दूरध्वनी संभाषणाच्या चौकशीत लवकरच मोठी प्रगती होईल.

डिप्पी वांकाणी,

मुंबई- माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे आणि दाऊद इब्राहिम यांच्यातील कथित दूरध्वनी संभाषणाच्या चौकशीत लवकरच मोठी प्रगती होईल. कारण, मोबाइल कंपन्यांकडून केवळ एका महिन्याच्या दूरध्वनी संभाषण नोंदींची (कॉल डाटा रेकॉर्ड्स अर्थात सीडीआर) माहिती मिळायची आहे. गृह विभागातील सूत्रांनी ही माहिती दिली. खडसे आणि दाऊद इब्राहिम यांच्यात फोन कॉल्स झाले किंवा नाहीत हे सीडीआरद्वारे स्पष्ट होईल; मात्र तपास अधिकारी खडसे व दाऊदमध्ये फोन कॉल्स झाल्याचा आरोप करणाऱ्या एथिकल हॅकरचीही चौकशी करणार आहेत. हॅकरने पाकिस्तानच्या टेलिफोन सेवा पुरवठादाराकडून फोन कॉल्सची माहिती कशी प्राप्त केली हे त्यांना माहीत करून घ्यायचे आहे, असे या सूत्रांनी सांगितले. दाऊदची पत्नी मेहजबीन हिच्या नावावर असलेल्या लॅण्डलाइन क्रमांकावरून खडसेंच्या मोबाइलवर सप्टेंबर २०१५ ते एप्रिल २०१६ दरम्यान फोन कॉल्स झाल्याचा आरोप इथिकल हॅकर मनिष भंगाळे याने केला होता; मात्र या प्रकरणाचा तपास करणाऱ्या गुन्हे शाखेने खडसेंच्या मोबाइलवर या काळात एकही आंतरराष्ट्रीय फोन कॉल झाला नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर भंगाळेने आपली भूमिका बदलत नंतर जानेवारी ते एप्रिल २०१५ दरम्यान हे फोन कॉल झाल्याचा आरोप केला. मोबाइल सेवा पुरविणाऱ्या कंपन्या एक वर्षापर्यंतचाच सीडीआर ठेवतात. त्यामुळे गुन्हे शाखेने तातडीने खडसेंच्या मोबाइलचा सप्टेंबर २०१५ ते एप्रिल २०१६ दरम्यानचा सीडीआर मिळविला व त्याचे अवलोकन करून त्या काळात त्यांच्या फोनवरून कोणताही आंतरराष्ट्रीय फोन कॉल्स न झाल्याचे स्पष्ट केले. मोबाइल कंपनीने पोलिसांना तसे लेखी दिले आहे, असे सूत्रांनी सांगितले. >१४ जूनपर्यंत सुनावणी तहकूब कथित दूरध्वनी संभाषणाच्या सीबीआय चौकशीसाठी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवरील सुनावणी सोमवारी कोर्टाने १४ जूनपर्यंत तहकूब केली. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी उच्च न्यायालयाने सीबीआयच्या अधिकाऱ्यांचे विशेष पथक नेमावे, तसेच आपल्याला संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी बडोदा येथील एथिकल हॅकर मनिष भंगाळे याने याचिकेद्वारे केली आहे.न्या. नरेश पाटील व न्या. प्रकाश नाईक यांच्या खंडपीठासमोर भंगाळे याच्या वकील अपर्णा वटकर यांनी ही याचिका सादर केली. या प्रकरणाची माहिती देण्यासाठी प्रंतप्रधानांसह नॅशनल सिक्युरिटी अ‍ॅडव्हायझर्सना भेटण्याचे प्रयत्न केले. मात्र, सगळे प्रयत्न व्यर्थ गेले. अद्याप खडसेंविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही, असे याचिकेत म्हटले आहे.पोलिसांना दिलेली सर्व माहिती दडपण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी भीतीही भंगाळेने व्यक्त केली आहे. ‘जबानी नोंदवून सर्व पुरावे घेण्याऐवजी राज्य सरकार आणि पोलिसांनी खडसे यांना ‘क्लीन चिट’ देण्याची घाई केली. दाऊद इब्राहिमच्या टेलीफोन बिल्सवरून दाऊदचे आर्थिक जाळे कुठवर पसरले आहे, हे सरकारला कळेल. चित्रपटांपासून क्रिकेट बेटिंगपर्यंत दाऊदचे साम्राज्य पसरले आहे,’ असे भंगाळे याने याचिकेत म्हटले आहे. भाजपा कार्यकर्त्यांची निदर्शने माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या समर्थनार्थ जळगावहून आलेल्या काही कार्यकर्त्यांनी सोमवारी भाजपाच्या येथील प्रदेश कार्यालयासमोर निदर्शने केली. सुमारे ३० कार्यकर्त्यांनी खडसेंच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली आणि फलक फडकाविले. खान्देश हित संग्राम संघटनेचे हे कार्यकर्ते होते. भाजपामध्ये अनेक वर्षे निष्ठेने काम केलेले खडसे हे बहुजन समाजाचे असल्याने अन्याय होत असल्याची भावना या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. या वेळी प्रदेश कार्यालयाबाहेर चोख पोलीस बंदोबस्त होता.

>खडसेंवर मकोका लावा - निरुपम

राज्याचे माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचे अंडरवर्ल्ड डॉन दाउद इब्राहिमशी संबंध असल्याचा आरोप असल्यामुळे त्यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्याखाली (मकोका) कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केली. उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत त्यांची चौकशी करणे ही अतिशय किरकोळ कारवाई आहे, असे सांगून ते म्हणाले की, खडसे यांना दाउदच्या पाकिस्तानातील घरून फोन आल्याचा आरोप असताना केवळ त्यांच्या राजीनाम्याने जनतेचे समाधान होणार नाही. पुणे येथील एमआयडीसीचा भूखंड पत्नी व जावयाच्या नावावर केल्याबद्दल खडसे यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याखालीही कारवाई होणे गरजेचे आहे. दहशतवादविरोधी पथकाकडेच तपास सोपवणे आवश्यक आहे, असे निरुपम यांनी म्हटले आहे.