शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबतचा विकल्प अर्ज उपलब्ध

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2020 21:06 IST

१३ सप्टेंबरपर्यंत अर्ज भरण्यास मुदत

ठळक मुद्देसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात देशभरातील व परदेशातील विद्यार्थी घेत आहेत शिक्षणपुणे, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांची संख्या सुध्दा मोठी

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने अंतिम सत्र / वषार्तील पात्र विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन पध्दतीने परीक्षा देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली असून विद्यार्थ्यांना ऑफलाईन पध्दतीने सुद्धा परीक्षा देता येणार आहे. विद्यापीठाच्या संकेतस्थळावरून विद्यार्थ्यांना येत्या १३ सप्टेंबरपर्यंत आपल्या लॉगइन आयडीतून विकल्प अर्ज भरता येणार आहे.    सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार व राज्य शासनाने दिलेल्या निदेर्शानुसार अंतिम वर्षाच्या परीक्षा घेतल्या जात आहेत.तसेच विद्यार्थ्यांच्या नियमित व अनुशेषांतर्गत लेखी परीक्षा, तसेच प्रात्यक्षित/मौखिक/प्रकल्प/चर्चासत्रे या परीक्षांच्या आयोजनाबाबत विद्यापीठाच्या अधिकार मंडळांनी मान्यता दिलेली आहे. अधिकार मंडळांच्या मार्गदर्शक तत्वानुसार अंतिम सत्राच्या व अंतिम वर्षाच्या सर्व अभ्यासक्रमांमधील विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे नियोजन विद्यापीठातर्फे केले जात आहे.    सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात देशभरातील व परदेशातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्याचप्रमाणे विद्यापीठाशी संलग्न पुणे, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांची संख्या सुध्दा मोठी आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता अंतिम वर्षातील परीक्षांसाठी सर्व पात्र विद्यार्थ्यांकरिता विद्यापीठाने ऑनलाइन पध्दतीने परीक्षा देण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या लाँगिन आयडीवर विकल्प अर्ज उपलब्ध करुन देण्यात आला असून विद्यार्थ्यांना बाबत काही अडचण असल्यास विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य, परीक्षा अधिकारी/ विषय शिक्षक यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन विद्यापीठातर्फे करण्यात आले आहे. ------------------विद्यार्थ्यांना परीक्षांबाबतचा विकल्प अर्ज http://sps.unipune.ac.in/लिंकवर उपलब्ध होईल--------------------------- विद्यार्थ्यांना आपल्या लॉगइन आयडीतून विकल्प अर्ज भरता येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिकूल परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांनी त्यांच्या आरोग्याची सुरक्षितता धोक्यात न घालता पालकांच्या सहकार्याने विकल्प अर्ज भरावा. तसेच विद्यापीठाने उपलब्ध केलेल्या आॅनलाइन पध्दतीने परीक्षा देण्याचा अवलंब करावा.- डॉ.महेश काकडे ,संचालक ,परीक्षा व मूल्यमापन मंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याEducationशिक्षणexamपरीक्षाStudentविद्यार्थीcollegeमहाविद्यालय