निर्माते अली मोरानी यांच्या घरावर गोळीबार

By Admin | Updated: August 26, 2014 02:57 IST2014-08-26T02:57:14+5:302014-08-26T02:57:14+5:30

चित्रपट निर्माते अली मोरानी यांच्या निवासस्थानी शनिवारी रात्री १०च्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी चार गोळ्या झाडल्या.

Filmmaker Ali Mourani's house firing | निर्माते अली मोरानी यांच्या घरावर गोळीबार

निर्माते अली मोरानी यांच्या घरावर गोळीबार

मुुंबई : चित्रपट निर्माते अली मोरानी यांच्या निवासस्थानी शनिवारी रात्री १०च्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी चार गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात कोणीही जखमी झाले नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोरानी यांना गँगस्टर रवी पुजारीकडून खंडणीसाठी धमक्या येत होत्या. या प्रकरणी गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाकडून तपासही सुरू होता. त्यामुळे हा गोळीबारही पुजारी टोळीकडूनच झाल्याचा अंदाज पोलिसांकडून व्यक्त होत आहे.
जुहू-विलेपार्लेच्या अशोक नगरातील शगुन इमारतीवर मोटारसायकलवरून आलेल्या तीन अज्ञात तरुणांनी गोळीबार केला. याच इमारतीत मोरानी राहतात. मात्र हल्ला झाला तेव्हा मोरानी परदेशात होते. इमारतीच्या सुरक्षा रक्षकाने गोळीबाराचा आवाज ऐकला. मोटारसायकलवरील तीन हल्लेखोरांनाही पाहिले. त्याचा जबाब नोंदविण्यात आला असून, पोलीस सीसीटीव्ही चित्रणही तपासत आहेत.
सीसीटीव्हीतही तीन हल्लेखोर कैद झाले असून, त्यांचे चेहेरे ओळखण्याइतपत स्पष्ट असल्याचे समजते. मोरानी घरी नसल्याने सुरक्षा रक्षकाने दुसऱ्या दिवशी सकाळी मोरानी यांच्या बंधूंना हल्ल्याबाबतची माहिती दिली. त्यानुसार रविवारी संध्याकाळी मोरानी यांचे अन्य बंधू जुहू पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आल्याचे समजते. (प्रतिनिधी)

Web Title: Filmmaker Ali Mourani's house firing