पतिव्रता ‘अहिल्येचा उद्धार’ चलचित्र देखावा

By Admin | Updated: September 10, 2016 02:39 IST2016-09-10T02:39:57+5:302016-09-10T02:39:57+5:30

त्रेता युगातील गौतम ऋषीची पत्नी अहिल्या त्रिखंडात सौदर्यवती असल्याची बातमी नारदाने इंद्राला दिली.

The film 'Salvation of the Ahilya' movie scenes | पतिव्रता ‘अहिल्येचा उद्धार’ चलचित्र देखावा

पतिव्रता ‘अहिल्येचा उद्धार’ चलचित्र देखावा


पेण : त्रेता युगातील गौतम ऋषीची पत्नी अहिल्या त्रिखंडात सौदर्यवती असल्याची बातमी नारदाने इंद्राला दिली. स्त्रीलंपट इंद्राने अहिल्येचे पातिव्रत भंग केले. गौतम ऋषी आपल्या कुटील आले तेंव्हा खरा प्रकार त्यांच्या लक्षात आला. इंद्र व अहिल्येला शाप देताना अहिल्येने मी निष्पाप असून कोणताही अपराध केलेला नाही तेंव्हा माझे शीलेत परिवर्तन होण्या अगोदर मला उ:शाप द्यावा अशी विनंती केली. गौतम ऋषींनी अहिल्येला उ:शाप देताना भगवान श्रीहरी विष्णू राम अवतारात जेंव्हा या पृथ्वी तलावर येतील तेंव्हा त्यांच्या चरणस्पर्श होऊन तू या शिळेतून मुक्त होशील असे सांगितले. त्रेतायुगातील पौराणिक क थेचा संदर्भ घेऊन आठ मिनिटांचा हा चलतचित्र देखावा ३९ व्या सार्वजनिक गणेशोत्सव पेण नगरपरिषद कर्मचारी मंडळाने साकारला आहे.
‘‘अहिल्या द्रौपदी सीता
तारा मंदोधरी’’
पंचकन्या स्मरे नित्यम सर्व
पापनाश हरणम
भारतीय संस्कृतीत या महान पंचकन्या पतिव्रता धर्माचे पालन करणाऱ्या प्रत्येक सुकन्येची जीवनकथा वेगवेगळी आहे. अहिल्येच सौंदर्यच तिच्या पतीधर्मा आड येवून भंग करण्याच्या मनोवृत्तीला शाप, उ:शापाचा मुलामा देवून प्राचीन युगातील स्त्री जन्माची कहाणी मांडली आहे.
चलचित्रात नारद, इंद्र, गौतम ऋषी, अहिल्या उभी व दगडात बसलेले प्रभू श्रीराम, लक्ष्मण, विश्वमित्र अशा आठ चित्रांची मांडणी व प्रसंगानुरुप चित्र सरकारुन त्यांची हालचाल व केलेले कथाकथन या सर्व घटकांवर आठ मिनिटांचा हा चलचित्र देखावा रसिक प्रेक्षकांची गर्दी खेचत आहे. मंडळाचे अध्यक्ष दयानंद गावंड, शिवाजी चव्हाण व योगेश पाटील यांच्या संकल्पनेतून हा देखावा साकारण्यात आला आहे.
चलचित्र देखाव्यात गौतम ऋषी कुटीसह निसर्गरम्य परिसराचे चित्र चित्रकार रमाकांत पेंटर यांनी साकारले आहे. बेटी बचाव, स्त्री सक्षमीकरणाच्या अनुषंगाने अहिल्येचा उद्धार या पौराणिक कथेतून मांडला आहे. (वार्ताहर)

Web Title: The film 'Salvation of the Ahilya' movie scenes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.