भूसंपादनाविरोधात देशभर जेल भरो

By Admin | Updated: March 3, 2015 02:04 IST2015-03-03T02:04:48+5:302015-03-03T02:04:48+5:30

केंद्र सरकारने शेतकरीविरोधी भूमी संपादन कायद्यात सुधारणा करावी व जाचक अटी रद्द करण्याच्या मागणीसाठी वर्धा ते दिल्ली पदयात्रा काढण्यात येणार आहे.

Fill in jail all over the country due to land acquisition | भूसंपादनाविरोधात देशभर जेल भरो

भूसंपादनाविरोधात देशभर जेल भरो

पारनेर (अहमदनगर) : केंद्र सरकारने शेतकरीविरोधी भूमी संपादन कायद्यात सुधारणा करावी व जाचक अटी रद्द करण्याच्या मागणीसाठी वर्धा ते दिल्ली पदयात्रा काढण्यात येणार आहे. त्यानंतर दिल्लीसह देशभर जेल भरो आंदोलन करण्यात येईल, अशी माहिती ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिली आहे.
वर्धा येथे ९ मार्चला नियोजन बैठक होणार आहे. त्यानंतर आंदोलनाला गती देण्यात येणार आहे, असे अण्णांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये म्हटले आहे. केंद्र सरकारने नवीन भूमी संपादन कायद्याचा वटहुकूम काढला़ हा कायदा उद्योजकांच्या फायद्यासाठीच केल्याचा आरोप करीत हजारे यांनी केंद्र सरकारविरोधात जंतरमंतरवर आंदोलन केले़ आंदोलनात देशभरातील शेतकरी संघटनांनी धरणे धरून सहभाग नोंदविला होता. त्यानंतर विरोधी पक्षांनीही आक्रमक भूमिका घेतल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कायद्यामध्ये बदलाचे संकेत दिले होते; पण त्यात सुधारणा झाली नसल्याचे अण्णा हजारे यांचे म्हणणे आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या हितासाठी आपण वर्धा ते दिल्ली पदयात्रा काढणार आहोत, असे अण्णांनी स्पष्ट केले आहे.
सुमारे दोन ते अडीच महिन्यांच्या या यात्रेनंतर रामलीला मैदानावर जेल भरो आंदोलन होणार असल्याचे अण्णांनी ब्लॉगमध्ये लिहिले आहे. देशभरात गाव व तालुका पातळीपासून सर्वस्तरावर जेल भरो आंदोलन होणार असल्याचेही अण्णांचे साहाय्यक दत्ता आवारी व शाम पठाडे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

च्भूमी संपादन कायद्याचा वटहुकूम उद्योजकांसाठीच
च्वर्धा ते दिल्ली पदयात्रा काढणार
च्देशभरात गाव व तालुका पातळीपासून सर्वस्तरावर होणार जेल भरो आंदोलन

Web Title: Fill in jail all over the country due to land acquisition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.