वासनकर समूहाविरुद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल
By Admin | Updated: November 9, 2014 01:53 IST2014-11-09T01:53:41+5:302014-11-09T01:53:41+5:30
पैसे दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून फसवणुकीप्रकरणी वासनकर समूहाविरुद्ध शनिवारी फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

वासनकर समूहाविरुद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल
अमरावती : पैसे दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून फसवणुकीप्रकरणी वासनकर समूहाविरुद्ध शनिवारी फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानुसार अमरावती पोलीस या आरोपींना प्रोडय़ुस वॉरंटवर नागपूरहून ताब्यात घेणार आहेत.
संजय शेळके (45), मनीष गायकवाड व अनंत देशमुख यांनी शनिवारी फ्रेजरपुरा पोलिसांत वासनकर समूहाविरुद्ध तक्रार दिली. नागपूर येथील प्रशांत वासनकर हे वेल्थ मॅनेजमेंटचे संचालक आहेत. त्या अनुषंगाने ते गुतवणुकदारांसाठी विविध योजनांच्या माध्यमातून पैसे जमा करीत होते. विविध योजनांत पैसे भरल्यास रक्कम दुप्पट किंवा तिप्पट करून देण्याचे आमिष गुंतवणुकदारांना दाखविण्यात येत होते. अनेक गुतवणुकदारांनी सुमारे 24 लाख 1 हजार रुपयांची गुतवणूक या समूहात केली होती. मात्र वासनकर समूहाने दिलेल्या वेळेनंतरही गुतवणुकदारांना पैसे परत मिळाले नाहीत. त्यामुळे गुतवणुकदारांना फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल़े याप्रकरणी काही गुंतवणुकदारांनी नागपूर येथील अंबाझरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मात्र या फसवणूक प्रकरणाचा संबंध अमरावतीशी असल्यामुळे तीन गुतवणुकदारांनी अमरावती येथील फ्रेजरपुरा पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्या तक्रारीच्या आधारे फ्रेजरपुरा पोलिसांनी आरोपी विनय वासनकर, प्रशांत वासनकर, भाग्यश्री वासनकर, चंद्रकांत राय, मनोज पांडे, अभिजित चौधरीविरुद्ध गुन्हा दाखल केला. (प्रतिनिधी)