शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

फाईलींचा प्रवास ठरला; अजित पवारांकडून व्हाया फडणवीस मुख्यमंत्र्यांकडे, हस्तक्षेपानंतर शिंदे ॲक्शन मोडमध्ये

By यदू जोशी | Updated: August 30, 2023 06:52 IST

मुख्यमंत्री अध्यक्ष असलेल्या प्रकल्पांची आढावा बैठक पवार यांनी नुकतीच घेतली होती. मुख्यमंत्र्यांच्या ‘वॉर रुम’मध्ये पवार यांनी बैठक घेतली होती.

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या कामात हस्तक्षेप चालविला असल्याच्या बातम्या येत असताना आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना चाप लावला आहे. धोरणात्मक निर्णयाच्या सर्व फायली या अजित पवार यांच्याकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जातील आणि तेथून त्या आपल्याकडे येतील असे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांच्या निर्देशानुसार देण्यात आले आहेत. 

मुख्यमंत्री अध्यक्ष असलेल्या प्रकल्पांची आढावा बैठक पवार यांनी नुकतीच घेतली होती. मुख्यमंत्र्यांच्या ‘वॉर रुम’मध्ये पवार यांनी बैठक घेतली होती. टीका काँग्रेसने केली होती. तेव्हा, अर्थमंत्री म्हणून माहिती घेण्याचा, बैठकी घेण्याचा अधिकार मला आहे, असे पवार यांनी स्पष्ट केले होते.  अर्थ मंत्र्यांकडून मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव जातात अशीच पद्धत वर्षानुवर्षे राहिली आहे. मात्र, आता उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे आधी अजित पवारांकडून प्रस्ताव जाईल, फडणवीस यांच्या शेऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांकडे जाईल.

असा होणार प्रवास...- मंत्रिमंडळापुढे येणारे विषय. - नवीन कर बसविणे, मूल्य निर्धारण करणे, नवीन कर्ज काढणे हे प्रस्ताव.- ज्याला वित्त मंत्र्यांची संमती नाही, असा राज्याच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम करणारा कोणताही प्रस्ताव.- विधानमंडळात मांडावयाची विधेयके, तसेच जारी करावयाचे अध्यादेश या बाबतचे प्रस्ताव. - महसुली उत्पन्नाबाबतचे प्रस्ताव.- विविध चौकशी समित्यांचे अहवाल.या शिवाय किमान १५ असे विषयही आहेत, ज्यांचा प्रवास पवार-फडणवीस-शिंदे असा होईल.

काय म्हटले आदेशात?राज्य सरकारच्या कार्यनियमावलीच्या नियम ९ २ (ब) नुसार समाविष्ट असलेली सर्व प्रकरणे मंत्रिमंडळासमोर येतील अशी तरतूद आहे. या नियमावलीच्या दुसऱ्या अनुसूचीत असलेली सर्व प्रकरणे (धोरणात्मक निर्णय) उपमुख्यमंत्री व अर्थ मंत्री अजित पवार यांच्यानंतर उपमुख्यमंत्री व गृह मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांकडे सादर केली जाईल, असे आदेशात म्हटले आहे.  

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवारEknath Shindeएकनाथ शिंदे