निवृत्त पोलिसांवर गुन्हा दाखल!
By Admin | Updated: March 16, 2015 02:34 IST2015-03-16T02:34:19+5:302015-03-16T02:34:19+5:30
तपासाची कागदपत्रे स्वत:जवळ ठेवून आरोपीला एक प्रकारे मदत केल्याच्या आरोपातून पोलीस उपअधीक्षकांच्या आदेशाने दोघा निवृत्त पोलिसांवर अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.

निवृत्त पोलिसांवर गुन्हा दाखल!
अहमदनगर : तपासाची कागदपत्रे स्वत:जवळ ठेवून आरोपीला एक प्रकारे मदत केल्याच्या आरोपातून पोलीस उपअधीक्षकांच्या आदेशाने दोघा निवृत्त पोलिसांवर अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीस अधीक्षक लखमी गौतम यांना एका गुन्ह्याच्या तपासामध्ये तोफखाना पोलीस ठाण्यातून निवृत्त झालेले हेड कॉन्स्टेबल शंकर ग्याना बनकर आणि अर्जुन भाऊसाहेब पटारे यांच्याकडे कागदपत्रे असल्याचे आढळले होते. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध दस्तावेज सादर न करणे, पुरावा नष्ट करणे आणि आरोपीला शिक्षेपासून वाचविण्याचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीस कर्मचारी बऱ्याच वेळा निवृत्तीआधी ते करत असलेल्या तपासाची माहिती संबंधित पोलीस ठाण्याला देत नाहीत. तपासाची कागदपत्रेही ते काहीवेळा स्वत:जवळच बाळगतात. त्यामुळे त्यांच्या निवृत्तीनंतर गुन्ह्यांचा तपास रखडतो. आरोपी मोकाटच राहतात. फिर्यादी केवळ पोलीस ठाण्यात फेऱ्या मारतात.
पोलीस कर्मचारी-अधिकारी निवृत्त झाल्यानंतर ते जबाबदारीतून मुक्त होत नाहीत. त्यांनी तपासाची माहिती संबंधित ठाण्यात देणे आवश्यक आहे, असे पोलीस उपअधीक्षक वाय.डी. पाटील यांनी सांगितले. (प्रतिनिधी)