विवाहितेवर बलात्कार, अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल

By Admin | Updated: April 16, 2016 12:34 IST2016-04-16T12:34:13+5:302016-04-16T12:34:13+5:30

एका विवाहितेवर बलात्कारप्रकरणी अकोला जिल्ह्यातील हिवरखेड पोलिस ठाण्यात शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला

Filed under rape, atrocity under Marriage | विवाहितेवर बलात्कार, अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल

विवाहितेवर बलात्कार, अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल

>हिवरखेड (अकोला जिल्हा): एका विवाहितेवर बलात्कारप्रकरणी अकोला जिल्ह्यातील हिवरखेड पोलिस ठाण्यात शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींमध्ये एका महिलेसह पाच जणांचा समावेश आहे. विवाहितेवर 9 मार्च ते 29 मार्च या कालावधीत अत्याचार करण्यात आहे. पिडीत विवाहितेचा पती शुक्रवारी बाहेरगावाहून परतल्यानंतर तिने पतीला घटनाक्रम सांगितला. त्यानंतर तिने पोलिस स्टेशनला धाव घेतली. आरोपींविरुद्ध ऍट्रॉसिटी ऍक्टअन्वयेदेखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मातीन, शेख वहिद अब्दुल रफिक, साजिद उर्फ सांभा, मुलतान उर्फ लाला, शमशाद बी शेख कालीम (सर्व राहणार अडगाव, जिल्हा अकोला) या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Filed under rape, atrocity under Marriage