अश्लील व्हिडीओप्रकरणी गुन्हा दाखल
By Admin | Updated: December 24, 2014 02:37 IST2014-12-24T02:37:13+5:302014-12-24T02:37:13+5:30
गेल्या आठ दिवसांपासून चर्चेत असलेल्या मुरबाड तहसील कार्यालयातील अश्लील चित्रफीतप्रकरणी सेतू सुविधा केंद्रातला कर्मचारी गोपाळ पटेल

अश्लील व्हिडीओप्रकरणी गुन्हा दाखल
टोकावडे / म्हसा : गेल्या आठ दिवसांपासून चर्चेत असलेल्या मुरबाड तहसील कार्यालयातील अश्लील चित्रफीतप्रकरणी सेतू सुविधा केंद्रातला कर्मचारी गोपाळ पटेल व अन्य अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
गोपाळ पटेल आणि कार्यालयातील एका महिला कर्मचाऱ्यासोबतची प्रणयराधनेची एक जुनी अश्लिल व्हिडीओ क्लिप मुरबाड येथील ‘तलाठी संजय पोटे’ या नावाने व्हॉटस्अॅपवर गेल्या आठ दिवसांपासून सर्वत्र फिरत होती़ ती कुणीतरी तलाठी देवजी पोटे यांच्या मोबाईलवर पाठविल्याने ते हैराण झाले़ त्यामुळे त्यांनी या घटनेची माहिती तत्काळ नायब तहसीलदार विजय तळेकर यांना सांगितली.
या क्लिपमधील ‘तलाठी संजय पोटे’ हे नाव आपल्या आडनावाशी साधर्म्य दाखवत असल्याने देवजी पोटे यांनी मुरबाड पोलीस ठाण्यात तक्रार केली. या क्लिपमुळे तलाठी देवजी पोटे, महिला कर्मचारी आणि तहसील कार्यालयाची बदनामी झाली असल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी आता अधीक तपास सुरू आहे. (प्रतिनिधी)