आमदाराच्या संस्थेविरूद्ध गुन्हा दाखल

By Admin | Updated: July 22, 2015 23:03 IST2015-07-22T23:03:17+5:302015-07-22T23:03:17+5:30

निधीसाठी बनावट कागदपत्रे तयार केल्याचा आरोप.

Filed a complaint against the organization of the MLA | आमदाराच्या संस्थेविरूद्ध गुन्हा दाखल

आमदाराच्या संस्थेविरूद्ध गुन्हा दाखल

बुलडाणा : देहविक्री करणार्‍या महिलांसाठी काम करणार्‍या एका संस्थेने निधी मिळविण्यासाठी महिलांची बनावट कागदपत्रे तयार केल्याचा आरोप एका महिलेने केला असून, या महिलेच्या तक्रारीनुसार बुलडाणा पोलिसांनी संस्थेविरूद्ध बुधवारी गुन्हा दाखल केला. काँग्रेसचे आमदार हर्षवर्धन सपकाळ अध्यक्ष असलेल्या मातृभूमि फाऊंडेशन नावाच्या बुलडाणा जिल्ह्यातील संस्थेविरूद्ध एका महिलेने ही तक्रार केली आहे. या तक्रारीनुसार, ही संस्था देहविक्रीचा व्यवसाय करणार्‍या महिलांसाठी काम करते. या कामासाठी संस्थेकडून निधी घेतला जातो. संस्थेने बनविलेल्या महिलांच्या यादीत, आपले नाव नमुद करून बदनामी केल्याचा आरोप एका महिलेने केला आहे. या महिलेने बुलडाणा पोलिसांकडे तक्रार दिली असून, त्यानुसार संस्थेविरूध्द भादंविचे कलम ४६८, ५६९, ५0१ अन्वये बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला. यासंदर्भात आ. सपकाळ यांची बाजू जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा वारंवार प्रयत्न केला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

Web Title: Filed a complaint against the organization of the MLA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.