शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
2
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
3
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
4
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
5
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
6
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
7
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
8
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
9
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
10
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
11
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
12
कोकणात आणखी सहा ग्रोथ सेंटर्स; १०६ गावांत विकास केंद्रे, पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना   
13
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
14
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
15
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
16
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
17
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
18
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
19
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
20
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला

प्रशांत कोरटकरविरोधात राष्ट्रदोहाचा गुन्हा दाखल करा, नागपूर राजघराण्यातील भोसलेंची मागणी

By योगेश पांडे | Updated: March 23, 2025 19:37 IST

Nagpur News: इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना फोनवरून शिवीगाळ करत छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणारा प्रशांत कोरटकर फरारच आहे. त्याच्याविरोधात राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी राजे मुधोजी भोसले यांनी केली आहे.

- योगेश पांडे नागपूर - इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना फोनवरून शिवीगाळ करत छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणारा प्रशांत कोरटकर फरारच आहे. त्याच्याविरोधात राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी राजे मुधोजी भोसले यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठविले आहे.

कोरटकरविरोधात नागपूर, कोल्हापूर व जालना येथे गुन्हे दाखल झाले आहेत. न्यायालयाने अटकपूर्व जामीन दिल्यानंतरदेखील कोरटकर समोर आला नव्हता. आता त्याचा जामीन फेटाळल्यानंतर त्याला अटक करण्यासाठी कोल्हापूर येथील पोलिसांचे पथक नागपुरात पोहोचले. मात्र त्याच्या निवासस्थानी तो आढळला नाही. पोलीस पथकाने चंद्रपूर व मध्यप्रदेशमध्येदेखी त्याचा शोध घेतला. बेलतरोडी पोलिस ठाण्याच्या मदतीने त्याचा शोध सुरू आहे. नागपूर सायबर पोलिस ठाण्याचीदेखील मदत घेण्यात येत आहे. मुख्यमंत्र्यांनी ज्याला ‘चिल्लर’ म्हटले तो कोरटकर पोलिसांकडून पकडल्या जात नसल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. या पार्श्वभूमीवर भोसले यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीले आहे. कोरटकरला अटक होत नाही हे गृहविभागाचे अपयश आहे. महाराष्ट्रातील पोलिसांवर यामुळे मोठी नामुष्की ओढविली आहे. कोरटकरला सहकार्य करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा. तसेच कोरटकरविरोधात राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भोसले यांनी केली आहे.

टॅग्स :nagpurनागपूरCrime Newsगुन्हेगारी