शहरं
Join us  
Trending Stories
1
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
2
ऐकावं ते नवलच! नाव डॉग बाबू, वडील कुत्ता बाबू अन् आई कुटिया देवी; कुत्र्यासाठी बनवले रहिवासी प्रमाणपत्र
3
दक्षिण कोरियाने मैत्रीचा हात पुढे केला, किम जोंग यांची बहिण म्हणाली, "कोणताही रस नाही..."
4
दहशतवादी पहलगाममध्ये घुसलेच कसे? PoK का घेतले नाही? काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान नेमकं काय घडलं, किती दहशतवादी मारले गेले? राजनाथ सिंह यांनी लोकसभेत दिली माहिती, म्हणाले...
6
VIDEO: जाडेजा-स्टोक्समध्ये हात मिळवण्यावरून राडा, सामना संपल्यावर 'शेक-हँड' नाकारलं?
7
Operation Mahadev: सैन्याला मोठे यश! पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी मुसा मारला गेल्याची शक्यता, तीन दहशतवादी ठार
8
‘डान्सबारमध्ये नाचणाऱ्या मुली लाडक्या बहिणी नाहीत का? मुली नाचवणाऱ्यांना वाचवणे कोणत्या हिंदुत्वात बसते?’, काँग्रेसचा सवाल   
9
Thailand Shooting: थायलंडमध्ये भर बाजारात बेछूट गोळीबार, सहा जणांचा मृत्यू, हल्लेखोराने स्वत:वरही झाडली गोळी  
10
महालक्ष्मी योगात नागपंचमी: ८ राशींवर शिव-लक्ष्मी कृपा, अपार धन-धान्य-लाभ; सुबत्ता-कल्याण काळ!
11
Mangalagauri 2025: मंगळागौरीचे सौभाग्यदायी व्रत कसे केले जाते? जाणून घ्या संपूर्ण पूजाविधी
12
IND vs ENG: टीम इंडियाला मोठा धक्का! ऋषभ पंत पाचव्या कसोटीतून बाहेर, CSKच्या खेळाडूला संघात स्थान
13
सातव्या वेतन आयोगांतर्गत पगारात लवकरच होणार अखेरची वाढ; कसा होणार १ कोटी कर्मचाऱ्यांना फायदा?
14
९० दीच्या लाटेवर स्वार व्हायला आली! कायनेटीकची DX ईव्ही लाँच झाली, पहा किंमत आणि रेंज...
15
Nitin Shete: शनि शिंगणापूर संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी संपवलं आयुष्य
16
Mumbai : 'Mhada अधिकाऱ्याची महिन्याला ४०-५० लाख काळी कमाई'; पत्नी वैतागली आणि संपवलं आयुष्य
17
"अल्लाह हू अकबर, विमानात बॉम्ब, मी तो उडवून देईन", प्रवाशाच्या धमकीनंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग
18
कुठे गायब झाली 'तेरे नाम'मधील भिकारीची भूमिका करणारी अभिनेत्री? पूर्ण बदललाय तिचा लूक
19
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
20
घरात मोठ्या आवाजात गाणी लावून पत्नीच्या डोक्यात टाकली वीट; हत्येनंतर पतीनेही संपवले जीवन

...तर माझा जीवही गेला असता; विनायक राऊत, नितीन देशमुखांवर गुन्हा दाखल करा - भावना गवळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2022 17:58 IST

विनायक राऊत, नितीन देशमुख यांच्याही घरी मायबहिणी आहेत. त्यांच्या मुलीबद्दल, पत्नीबद्दल अशी हीन दर्जाची वागणूक दिली असती तर ते तसेच पाहत उभे राहिले असते का? असा सवाल भावना गवळींनी उपस्थित केला.

मुंबई - अकोला रेल्वे स्टेशनवर अत्यंत घाणेरडे वृत्तीने तिथे माझ्यासोबत वर्तन घडले. त्या लोकांच्या जमावात माझा जीवही गेला असता. त्यामुळे खासदार विनायक राऊत, आमदार नितीन देशमुख या दोघांवर गुन्हे दाखल होऊन अटक झाली पाहिजे. माझी तक्रार मी राज्य महिला आयोग, लोकसभा अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्रालयाकडे करणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे असं शिंदे गटाच्या खासदार भावना गवळींनी म्हटलं आहे. 

खासदार भावना गवळी म्हणाल्या की, दरवेळीप्रमाणे अकोल्याहून मी मुंबईला येताना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत, आमदार नितीन देशमुख जवळपास ५०-१०० जणांसह तिथे होते. मी रेल्वेत बसत असताना त्यांनी लोकांना चिथवण्याचे काम केले. त्यांना माझ्या अंगावर पाठवले. अक्षरश: ते माझ्या अंगावर आले. माझा जीव जाईल असं त्यांचे कृत्य होते. नीच वागणूक तिथे झाली. हे सगळं काम विनायक राऊत, नितीन देशमुख यांनी केलेय. त्यामुळे अकोला एसपींकडे मी माझी तक्रार दिली आहे असं त्यांनी सांगितले. 

त्याचसोबत विनायक राऊत, नितीन देशमुख यांच्याही घरी मायबहिणी आहेत. त्यांच्या मुलीबद्दल, पत्नीबद्दल अशी हीन दर्जाची वागणूक दिली असती तर ते तसेच पाहत उभे राहिले असते का?. यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल व्हावे. हे राज्य छत्रपतींचे आहे. मी असं राजकारण करू शकत नाही. माझं राजकारण विकासाचं आहे. लोकांना समाधानी आणि योजना लोकांपर्यंत कशा पोहचल्या पाहिजे यासाठी राजकारण आहे असंही भावना गवळींनी सुनावलं. 

खरे गद्दार तुम्हीच आहातआम्ही बाळासाहेब ठाकरे, नरेंद्र मोदींच्या नावावर निवडून आलो. आज त्यांच्यासोबत राज्यात सरकार स्थापन केले आहे. बाळासाहेबांचे हिंदुत्व सोडून ज्यांनी विरोधकांशी युती केली ते खरे गद्दार आहे. तुम्ही चांगले वागले नाहीत म्हणून आम्ही गेलो नाही. काल जी कृती केली ती बोलण्यापलीकडची होती. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. ज्यांना महाराष्ट्र सांभाळता आले नाही ते बिहारला गेले. तुम्ही गद्दार आहात. तुम्हाला घर सांभाळता आलं नाही ते आमच्यावर टीका करतायेत. आधी घर सांभाळा अशा शब्दात खासदार भावना गवळींनी आदित्य ठाकरेंचा समाचार घेतला आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Bhavna Gavliभावना गवळीVinayak Rautविनायक राऊत Aaditya Thackerayआदित्य ठाकरेNitin Deshmukhनितीन देशमुख