चंद्रपूरात प्रेयसीच्या भावावर गोळीबार

By Admin | Updated: July 10, 2017 17:42 IST2017-07-10T17:42:02+5:302017-07-10T17:42:02+5:30

प्रेयसीसोबत लग्न करण्यास नकार दिल्याने संतापलेल्या प्रियकराने तिच्या भावावरच पिस्तुलातून दोन गोळ्या झाडून गंभीर जखमी केले.

Fighter fighter's brother fired at Chandrapur | चंद्रपूरात प्रेयसीच्या भावावर गोळीबार

चंद्रपूरात प्रेयसीच्या भावावर गोळीबार

>ऑनलाइन लोकमत
चंद्रपूर, दि. 10 - प्रेयसीसोबत लग्न करण्यास नकार दिल्याने संतापलेल्या प्रियकराने तिच्या भावावरच पिस्तुलातून दोन गोळ्या झाडून गंभीर जखमी केले. ही थरारक घटना रविवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास घुग्घुस येथे घडली. या प्रकरणी घुग्घुस पोलिसांनी सोमवारी दुपारी दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून पिस्तुलही जप्त केले आहे. मोसीम ऊर्फ कलवा(२४) व  बललु रा. शालिकग्राम नगर घुग्घुस कॉलरी असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. राकेश सुरेश बराडीया (२६) असे जखमीचे नाव आहे. 
मोसीमचे एका मुलीसोबत प्रेमसंबंध होते. मात्र त्यांच्या लग्नाला प्रेयसीच्या घरच्या मंडळींचा विरोध होता. यामुळे रविवारी रात्री मोसीम हा बल्लू नामक मित्राला घेऊन प्रेयसीच्या घरी गेला. यावेळीही तिच्या भावाने या लग्नाला विरोध केला. यावरुन मोसीम व त्याच्या मित्राने प्रेयसीच्या भावासोबत कडाक्याचे भांडण केले. भांडण विकापाला जाताच मोसीमने पिस्तुल काढून प्रेयसीच्या भावावर दोन गोळ्या झाडल्या. एक गोळी घराच्या भिंतीला लागली, तर एक  राकेशच्या उजव्या पायात घुसल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने चंद्रपूर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. 
 
याप्रकरणी घुग्घुस पोलिसांनी मोसीम व त्याच्या मित्राविरुद्ध हत्या करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली भादंवि ३०७ (३४), हत्यार कायदा ३, २४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळी उप पोलीस अधीक्षक हेमराज राजपुत यांनी भेट देऊन दिशा निर्देश दिले. विभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांनी तपास करून दोन्ही आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरले पिस्तुल जप्त केले. पुढील तपास ठाणेदार पगारे करीत आहे.

Web Title: Fighter fighter's brother fired at Chandrapur