महायुतीच्या झेंडय़ाखालीच लढणार
By Admin | Updated: June 19, 2014 22:47 IST2014-06-19T22:47:21+5:302014-06-19T22:47:21+5:30
महाराष्ट्रात महायुती विधानसभा निवडणूक लढतांना पक्ष म्हणून निवडणूक लढणार नाही.

महायुतीच्या झेंडय़ाखालीच लढणार
>कर्जत : महाराष्ट्रात महायुती विधानसभा निवडणूक लढतांना पक्ष म्हणून निवडणूक लढणार नाही. तर महायुतीच्या ङोंडय़ाखाली लढतांना पक्ष कोणताही असो, उमेदवार महायुतीचा असणार आहे. जेणोकरून महायुतीचे उमेदवार जनतेचे उमेदवार वाटतील, असा विश्वास राज्यसभा सदस्य आणि रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी व्यक्त केला.
कर्जत येथे राज्यसभा सदस्य झाल्याबद्दल रामदास आठवले यांच्या नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. त्यासाठी शिवसेना, भाजप आणि रिपाई या महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित होते. रिपाईचे पातळीवरील नेते राहुल डाळिंबकर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते .
याप्रसंगी रामदास आठवले यांनी दिल्लीची सत्ता जनतेने आम्हाला दिली आहे. त्यामुळे आम्हाला कोणत्याही स्थितीत महागाई कमी करावी लागणार आहे. त्यासाठी उपाययोजना करण्याचे काम सुरु आहे, पण तसे न केल्यास जनता आम्हाला सत्तेवरून खाली खेचेल,याची खात्नी असल्याने हे सरकार जनतेच्या मनासारखे काम करील,असा विश्वास आठवले यांनी व्यक्त केला.
आगामी विधानसभा निवडणुकीत आमच्या वाटय़ाला किती जागा येतील, आज सांगता येणार नाही, पण आम्ही महायुती सोडून जाणार नाही, असे जाहीर करीत आम्ही राज्यात लढतांना शिवसेना, भाजप, रिपाई, स्वाभिमान संघटना अथवा राष्ट्रीय समाज पक्ष म्हणून निवडणूक लढणार नाही, असा निर्धार त्यांनी जाहीर केला. (वार्ताहर)