मालेगावी चिटफंड कंपनीकडून दीड लाखाची फसवणूक
By Admin | Updated: December 29, 2016 20:52 IST2016-12-29T20:52:11+5:302016-12-29T20:52:11+5:30
व्याजाच्या रकमेचा अपहार करुन फसवणूक केल्याप्रकरणी कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

मालेगावी चिटफंड कंपनीकडून दीड लाखाची फसवणूक
ऑनलाइन लोकमत
मालेगाव (नाशिक), दि. 29 - येथील मॅक्स केअर चिटफंड प्रा. लि. कंपनीच्या मालेगाव शाखेच्या अधिकारी व व्यवस्थापनाने एक लाख ५६ हजाराची रक्कम व त्यावरील मिळणाऱ्या व्याजाच्या रकमेचा अपहार करुन फसवणूक केल्याप्रकरणी कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी रोहिदास तुकाराम जाधव यांनी आज फिर्याद दिली आहे. जाधव यांनी चिटफंड कंपनीत ११ हजाराचा भरणा करुन बचत खाते उघडले होते व कंपनीच्या अधिकारी व व्यवस्थापकाने टोकण दिले होते. तसेच नंबर येताच साडेतीन लाख मिळणार असे आश्वासन दिले होते. त्यानुसार दरमहा ५७०० रूपयांचा भरणा केला; मात्र संबंधित कंपनीने पैसे दिले नाहीत. कंपनीचा शाखा बंद करुन पळून गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास हवालदार खंडागळे करीत आहेत.