कपड्याच्या दुकानाला भीषण आग
By Admin | Updated: December 31, 2014 01:08 IST2014-12-31T01:08:04+5:302014-12-31T01:08:04+5:30
सीताबर्डी मार्केटच्या मुख्य मार्गावर असलेल्या टीआयटी गारमेंट न्यू कटपीसवाला या कपड्याच्या दुकानाला मंगळवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास अचानक आग लागून या दुकानातील चार लाखाचे

कपड्याच्या दुकानाला भीषण आग
चार लाखाचे नुकसान : सीताबर्डी मुख्य मार्गावरील घटना
नागपूर : सीताबर्डी मार्केटच्या मुख्य मार्गावर असलेल्या टीआयटी गारमेंट न्यू कटपीसवाला या कपड्याच्या दुकानाला मंगळवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास अचानक आग लागून या दुकानातील चार लाखाचे कपडे जळून खाक झाले. दरम्यान अग्निशमन विभागाचे सहा बंब घटनास्थळी पोहोचून त्यांनी दीड तासात आगीवर नियंत्रण मिळविले.
सीताबर्डी मार्केटच्या मुख्य मार्गावर राजेश गणेशलाल अग्रवाल (४५) यांचे कपड्याचे दुकान आहे. दुसऱ्या माळ्यावर त्यांचे गोडाऊन आहे. या गोडाऊनमध्ये मंगळवारी दुपारी १२ वाजता शॉट सर्किटमुळे अचानक आग लागली. कपड्याचे दुकान असल्यामुळे अल्पावधीतच या आगीने रुद्र रूप धारण केले. दरम्यान दीपक अग्रवाल यांनी मोबाईलवरून अग्निशमन विभागाला आगीची माहिती दिली. अग्निशमन विभागाचे सहा बंब घटनास्थळी दाखल झाले. परंतु दुसऱ्या माळ्यावरील गोडाऊनला टिनाचे पत्रे लावलेले असल्यामुळे गोडाऊनमध्ये पाणी जात नव्हते. त्यावर झाडे लावण्यासाठी असलेल्या सिमेंटच्या कुंड्या या टिनपत्र्यांवर मारून हे पत्रे तोडण्यात आले. त्यानंतर आत पाणी फवारण्यात आले. दीड तासाच्या कालावधीनंतर अग्निशमन विभागाला आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. यात दुकानातील चार लाखाच्या कपड्यांचे नुकसान झाल्याची माहिती अग्निशमन विभागाने दिली असून दुकानाचे संचालक राजेश गणेशलाल अग्रवाल यांनी दुकानातील २० लाखाच्या मालाचे नुकसान झाल्याची माहिती ‘लोकमत’ला दिली आहे. (प्रतिनिधी)