नाशिकजवळ सिलेंडर वाहून नेणारा कंटेनर उलटल्याने भीषण स्फोट
By Admin | Updated: May 10, 2016 12:43 IST2016-05-10T11:35:03+5:302016-05-10T12:43:35+5:30
नाशिकजवळील सटाणा येथे आज सकाळी सिलेंडर वाहून नेणारा कंटनेर डीव्हायडर चढून पलटी झाल्याने भीषण स्फोट झाला

नाशिकजवळ सिलेंडर वाहून नेणारा कंटेनर उलटल्याने भीषण स्फोट
ऑनलाइन लोकमत
सटाणा, दि. १० - नाशिकजवळील सटाणा येथे आज सकाळी सिलेंडर वाहून नेणारा कंटनेर डीव्हायडर चढून पलटी झाल्याने भीषण स्फोट झाला. आज सकाळी ६ च्या सुमारास झालेल्या या अपघातानंतर आत्तापर्यंत सहा सिलेंडरचा स्फोटो झाला आहे, मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
या गाडीत जवळपास ५० सिलेंडर होते. अपघातानंतर सटाणा नाशिक रस्ता बंद केला असून तहाराबादकडून नाशिककडे जाण्यासाठी नामपुर- मालेगांव- नासिक असा मार्ग वळवण्यात आला आहे.