गणपतीची वर्गणी देण्यास नकार देणा-या दाम्पत्याला बेदम मारहाण
By Admin | Updated: September 3, 2016 15:44 IST2016-09-03T11:29:42+5:302016-09-03T15:44:52+5:30
गणपतीची वर्गणी दिली नाही म्हणून दुकानदार व त्याच्या बायकोला मारहाण केल्याची घटना अहमदनगरमध्ये घडली आहे.

गणपतीची वर्गणी देण्यास नकार देणा-या दाम्पत्याला बेदम मारहाण
ऑनलाइन लोकमत
अहमदनगर, दि. ३ - गणपतीची वर्गणी दिली नाही म्हणून दुकानदार व त्याच्या बायकोला मंडळाच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना अहमदनगरमध्ये घडली आहे. एवढेच नव्हे तर मारहाणीनंतरते दाम्पत्य उपचारांसाठी रुग्णालयात गेले असता तेथेही त्यांना बडवण्यात आले. या घटनेचे सीसीटीव्ही फूटेज हाती आले असून पोलिस आता त्यावर काय कारवाई करतात, याकडेच सर्वांचे लक्ष आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गणेशोत्सवानिमित्त दुकानदार राजू पाटोळे यांच्याकडे काही जण वर्गणी मागण्यास आले. मात्र पाटोळे यांनी त्यांना वर्गण देण्यास नकार दिला असता संतापलेल्या कार्यकर्त्यांनी पाटोळे यांना मारहाण केली. त्यांना वाचवण्यासाठी पाटोळे यांची पत्नी मध्ये पडली असता, त्यांनाही मारण्यात आले. एवढेच नव्हे तर त्या नराधमांनी दुकानाचीही तोडफोडही केली. मारहाणीत जबर जखमी झालेले पाटोळे रुग्णालयात उपचारांसाठी गेले असता काही जणांनी रुग्णालयात जाऊन तेथेही त्यांना पुन्हा बेदम मारहाण केली. त्यामुळे रुग्णालयात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मारहाणीची ही दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून जमाव बेदम मारहाण करताना दिसत आहे.
दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी ज्यांनी मारहाण त्यांची फिर्याद दाखल करून घेतली आहे, मात्र मारहाणीत जखमी झालेले पाटोळे यांचा अद्याप जबाबही नोंदवण्यात आलेला नाही ना फिर्याद दाखल करून घेतली.