शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

वसंताच्या आगमनाचा रंगला फुलोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2017 01:19 IST

‘पळसाला पाने तीनच’ या म्हणीमुळे प्रसिद्ध झालेले पळसाचे झाड सध्या पाच पाकळ्यांच्या लालकेशरी भडक रंगाच्या फुलांनी भरले आहे.

नीलेश काण्णव,भीमाशंकर- ‘पळसाला पाने तीनच’ या म्हणीमुळे प्रसिद्ध झालेले पळसाचे झाड सध्या पाच पाकळ्यांच्या लालकेशरी भडक रंगाच्या फुलांनी भरले आहे. पोपटाच्या चोचीप्रमाणे असणारी ही फुले लांबून पाहिली असता जंगलातून लाल ज्वाला बाहेर येत असल्याचा भास होतो.शिशिराची गळती संपून वसंत पालवी झाडांना फुटू लागली आहे. वसंताच्या आगमनाबरोबर झाडांवर रंगीबेरंगी फुलांनी उधळण सुरू झाली आहे. कोकिळेची कुहूकुहू, पक्षांचा किलबिलाट, मधमाश्यांची गुणगुण याने आसमंत घुमू लागला आहे. पळस, काटेसावर, पांगारा, करपा अशा विविध फुलांनी डोंगरदऱ्या रंगून गेल्या आहेत. त्यात बहुउपयोगी असलेला पळस सर्वांचे लक्ष वेधून घेतो. पळसाच्या पानाच्या पत्रावळी बनवतात, पळसाची वाळलेली फुले पाण्यात भिजून उतरलेला रंग कपडे रंगवण्यासाठी वापरतात, सालीचा उपयोग कातडी कमावण्यासाठी करतात, बियांचे तेलही काढतात.पळसाबरोबरच लालभडक काटेसावरीची फुले जंगलात प्रत्येकाचे लक्ष आकर्षित करून घेत आहेत. सावरीच्या झाडाची पाने गळल्यानंतर टपोऱ्या कळ््या तयार होतात व याचे रूपांतर हाताच्या विताएवढ्या आकाराच्या फुलांमध्ये होते. या फुलांच्या तळाशी भरपूर पुष्परस असतो. त्यामुळे पक्षी, कीटक, मधमाश्या या झाडाला झोंबलेले असतात. फुले ताजी असतानाच खाली गळून पडतात व गळलेली फुले जंगली प्राणी खातात. फुले गळल्यानंतर बोंडे तयार होतात. हिरवी बोंडे तपकिरी होऊन उकलतात व त्यातून पांढरा कापूस निघतो. हा कापूस वाऱ्यावर उडताना ‘हिमवृष्टी’ होत असल्याचा भास होतो. पांगारा झाडाचा डेरेदार वृक्ष फुललेला असताना सगळ््यांचे लक्ष वेधून घेतो. पूर्ण फुलांनी भरलेले हे झाड जंगलामध्ये लांबून ज्वाळांचा भास देणारे, रंग भरणारे वाटते. उभ्या तिरप्या काटेरी फांद्यांवर खालून वर उमलत गेलेले दोन ते तीन फुलांचे गुच्छ लागलेले असतात. या फुलांमध्ये पाणी भरलेले असते व हे पाणी पक्षी उन्हाळ््यात पिण्यासाठी वापरतात. फुलांचा बहर संपत आल्यावर शेंगा येतात. सह्याद्रीच्या पर्वतरांगा अशा विविध फुलांनी रंगून गेल्या आहेत. शहराबाहेर पडल्यानंतर काही ठिकाणी हे वृक्ष दिसतात; परंतु याचे खरे सौंदर्य पाहण्यासाठी जंगलाकडेच जावे लागते.