शहापूर ठरणार पक्षिप्रेमींसाठी पर्वणी
By Admin | Updated: January 30, 2015 04:01 IST2015-01-30T04:01:03+5:302015-01-30T04:01:03+5:30
शहापूर तालुक्यात ‘वाइल्ड लाइफ’ या बोरिवलीच्या संस्थेने केलेल्या पक्ष्यांच्या सर्वेक्षणामध्ये अनेक दुर्मीळ प्रजातींचे पक्षी आढळले आहेत

शहापूर ठरणार पक्षिप्रेमींसाठी पर्वणी
जनार्दन भेरे, भातसानगर
शहापूर तालुक्यात ‘वाइल्ड लाइफ’ या बोरिवलीच्या संस्थेने केलेल्या पक्ष्यांच्या सर्वेक्षणामध्ये अनेक दुर्मीळ प्रजातींचे पक्षी आढळले आहेत. या पक्ष्यांच्या किलबिलाटाने शहापुरातील अभयारण्ये गजबजली आहेत. तानसा जलाशय व क्वॉरीपाडा जलाशयाच्या परिसरात हे सर्वेक्षण करण्यात आले. ‘वाइल्ड लाइफ’ संस्थेचे राजदेव सिंग, सुशांत मोरे, प्रवीण चव्हाण व खर्डी वनक्षेत्र कर्मचाऱ्यांनी यामध्ये भाग घेतला. यात तानसा जलाशयाच्या जंगलामध्ये ७३ प्रकारचे पक्षी आढळल्याचे सहायक वनसंरक्षक एस. शेख यांनी सांगितले.
या सर्वेक्षणात पाणकावळे ६०, खंड्या १०, तुतारी ४, पिवळा परीट १, पिवळा धोबी ६, सोनधोबी ५, पांढरा धोबी २, करडा धोबी ४, गायबगळे ५०, मीडियन इग्रेट ३, बगळे १०, मोठे बगळे ५, राखी बगळा १, वंचक २०, ब्राडन क्राऊड २, करकोचा २०, शराटी ७, बदक ३, नॉर्थन पेंटल ४०, बदक ४०, गॅडवेल २०, युरेशिअन विगन ३०, थापट्या ५०, काणूक ४, पाणकोंबडी २, वारकरी २५, सोनेरी रंगाची कमळपक्षी ८, छोटे पाणबदक ३०, शेकाट्या १, टिटवी ३, कंढेरी चिखल्या १, जांभळी पाणकोंबडी २, पाणकोंबडा १, हिरवा तुतवार २, हिरवा सुरमा २, ढिपकेवाला तुतवार २, रिव्हर टर्न ८, तास ५, धीवर २, तालवारी पाकोळी ५००, कॉमन शॉलवो ५०, पांगळी १००, उघडचोच करकोचा २४०, रुमॉल प्रेटिन कोल ५, कमी आवाजाचे बदक २० ते २५, लिटील ग्रॅबी १५० ते १६०, पाणकावळे ६० ते ७०, छोटे पाणकावळे ३०-४०, रिव्हरस्रे ८, ग्रे हेरन १२, वारकरी पाणरिलवा १, लालसरी ३००, वक्रांग १ यासह मरागा राखी रामगंगारा, कोतवाल, हिवाळी, सुरय, सुतार आदी पक्षी आढळले. त्यामुळे हा परिसर पर्यटक आणि पक्षीप्रेमींसाठी पर्वणी ठरणार असल्याचे वन कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे़