शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

 फरेरा, गोन्सालवीस आणि  भारद्वाज यांच्या पोलीस कोठडीत वाढ :चौकशी दरम्यान पोलिसांनी मारहाण केल्याचा फरेरांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2018 16:23 IST

पुणे : बंदी असलेल्या सीपीआ माओवादी संघटनांशी संबंध असल्याच्या कारणावरून अटक करण्यात आलेल्या अरुण फरेरा यांनी पोलीस कोठडी दरम्यान ...

पुणे : बंदी असलेल्या सीपीआ माओवादी संघटनांशी संबंध असल्याच्या कारणावरून अटक करण्यात आलेल्या अरुण फरेरा यांनी पोलीस कोठडी दरम्यान तपास अधिकारी सहायक पोलिस आयुक्त शिवाजी पवार यांनी त्यांच्या कार्यालयात चौकशी दरम्यान मारहाण केली असा दावा फरेरा यांनी विशेष न्यायाधीश आर. व्ही. आदोने  यांच्या न्यायालयात  मंगळवारी केला.

               दरम्यान अरुण फरेरा, व्हरनॉन गोन्सालवीस आणि सुधा भारद्वाज यांना पोलीस कोठडीची मुदत  संपत आल्याने पोलिसांनी कडक बंदोबस्तात  मंगळवारी न्यायालयात  हजर केले. यावेळी सरकारी वकील उज्वला पवार यांनी संबंधित तिनही आरोपींना  पोलीस कोठडीची हक्क अबाधित ठेवून 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी देण्यात यावी अशी मागणी केली. न्यायालयाने त्यानुसार सदर तिघांना 19 नोव्हेंबर पर्यन्त न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात यावे असा आदेश दिला. यावेळी आरोपींना कारागृहात वैद्यकीय सुविधा मिळाव्यात अशी मागणी केली. ती न्यायालयाने मान्य केली.

फरेरांचा  इन कॅमेरा जवाब अरुण फरेरा यांनी न्यायालयात सांगितले की, 4 नोव्हेंबर रोजी स्वारगेट येथील एसीपी कार्यालयात तपास अधिकारी  डॉ. शिवाजी पवार यांनी माझ्यासह व्हरनॉन गोन्सालवीस, सुधा भारद्वाज यांची स्वतंत्र चौकशी केली. सदर दोघांची चौकशीनंतर माझी चौकशी सुरू करण्यात आली. त्यावेळी तपास अधिकाऱ्यांनी चष्मा काढून ठेवला आणि त्यानंतर माझ्या गालावर  8 ते 10 थपडा लगावल्या. 5 नोव्हेंबर रोजी ससून रुग्णालयात तपासणी करण्यासाठी घेऊन गेले असता, डॉक्टराना मी घडलेला प्रकार सांगितला,  त्यांनी अहवाल तयार करून त्यात तसे नमूद केले. दरम्यान तपास अधिकरी डॉ. शिवाजी पवार तपासाठी बाहेर गावी गेले असल्याने सुनावणीसाठी हजर राहू शकले नाही. सरकारी वकील यांनी फरेरा याचा आरोप गंभीर असून त्यांची  इन कॅमरा जबाब नोंदवावा अशी मागणी केली.

टॅग्स :PuneपुणेBhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचारnaxaliteनक्षलवादीCourtन्यायालय