मुरळीचे लैंगिक शोषण; नगरमध्ये चौघांवर गुन्हा
By Admin | Updated: December 27, 2014 04:20 IST2014-12-27T04:20:59+5:302014-12-27T04:20:59+5:30
देवाशी लग्न लावून दिलेल्या मुरळीचे लैंगिक शोषण होऊन तिच्यावर मातृत्त्व लादल्याप्रकरणी येथील पोलीस ठाण्यात चौघांविरूद्ध गुन्हा दाखल झाला

मुरळीचे लैंगिक शोषण; नगरमध्ये चौघांवर गुन्हा
अकोले (जि.अहमदनगर) : देवाशी लग्न लावून दिलेल्या मुरळीचे लैंगिक शोषण होऊन तिच्यावर मातृत्त्व लादल्याप्रकरणी येथील पोलीस ठाण्यात चौघांविरूद्ध गुन्हा दाखल झाला असून तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
खंडोबा देवाशी लग्न लावण्याच्या अंधश्रद्धेतून १३ वर्षीय मुरळीवर लैंगिक अत्याचार झाल्याने तिच्यावर अकाली मातृत्व लादले गेले. गुरूवारी प्रकरण उजेडात येताच पोलिसांनी तातडीने मुलीच्या आजीला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.
बाल विवाह प्रतिबंधक समिती व अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या फिर्यादीवरुन अकोले पोलिसांत शुक्रवारी सायंकाळी बालविवाह प्रतिबंधक कायदा, लहान मुलांचा लैंगिक अत्याचार कायदा, लैंगिक शोषण कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल झाला.
मुलीच्या आजीने नवस बोलून त्याची फेड म्हणून नातीचे लहानपणीच खंडोबा देवाशी लग्न लावून दिले. विविध ठिकाणी जागरणासाठी जाणाऱ्या या मुरळीवर लैंगिक अत्याचार झाला. तिला दीड महिन्याचे तान्हे बाळ आहे. (प्रतिनिधी)