हेल्मेट सक्तीवरुन पार्ल्यात महिला पोलिसाला महिलेची मारहाण

By Admin | Updated: September 6, 2016 13:58 IST2016-09-06T13:47:33+5:302016-09-06T13:58:11+5:30

महिला पोलीस कॉन्स्टेबल प्रियांका खोत (३०) यांना एका महिलेने पोटात लाथ मारून श्रीमुखात भडकावत मारहाण केल्याचा प्रकार मंगळवारी विलेपार्ले परिसरात घडला.

Female policeman assaulting woman in Helmets forced | हेल्मेट सक्तीवरुन पार्ल्यात महिला पोलिसाला महिलेची मारहाण

हेल्मेट सक्तीवरुन पार्ल्यात महिला पोलिसाला महिलेची मारहाण

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. ६-  हेल्मेट घातले नाही म्हणून कारवाई करणाऱ्या विलेपार्ले पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस कॉन्स्टेबल प्रियांका खोत (३०) यांना एका महिलेने पोटात लाथ मारून श्रीमुखात भडकावत मारहाण केल्याचा प्रकार मंगळवारी विलेपार्ले परिसरात घडला. 
 
हेल्मेट न घातल्याप्रकरणी खोत यांनी या महिलेला अडविले. त्यानंतर हा प्रकार घडला. याप्रकरणी पोलिसांनी आरती सुरेश पाटलेकर (२७) आणि तिचा मोठा भाऊ सुदर्शन सुरेश पाटलेकर (३०) यांना अटक केली आहे. ज्याने खोत यांना बघून घेईन अशी धमकी दिल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. याप्रकरणी  अधीक चौकशी सुरु आहे.
 
मागच्याच आठवडयात मुंबईत दुचाकीस्वाराने केलेल्या माराहणीत जखमी झालेल्या वाहतूक पोलिस विलास शिंदे यांचा मृत्यू झाला होता. दोन दिवसांपूर्वी पुण्यातही पोलिसांवर गोळीबार झाला होता. 
 

Web Title: Female policeman assaulting woman in Helmets forced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.