महिला अत्याचार; तपास अधिकारी बदलला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 00:25 IST2017-07-18T00:25:12+5:302017-07-18T00:25:12+5:30
उदगीर शहरात एका खासगी रुग्णालयात उपचार घेऊन घराकडे निघालेल्या महिलेला तिघांनी पळवून अत्याचार केल्याची घटना घडून चार दिवस उलटले तरी आरोपींना

महिला अत्याचार; तपास अधिकारी बदलला
लोकमत न्यूज नेटवर्क
लातूर / उदगीर : उदगीर शहरात एका खासगी रुग्णालयात उपचार घेऊन घराकडे निघालेल्या महिलेला तिघांनी पळवून अत्याचार केल्याची घटना घडून चार दिवस उलटले तरी आरोपींना पकडण्यात यश आले नाही. त्यामुळे याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक सुधाकर सूर्यवंशी यांच्याकडून काढून घेत तो पोलीस निरीक्षक भीमाशंकर हिरमुखे यांच्याकडे देण्यात आला.
उदगीर शहरातील बोधननगर येथील ही ४५ वर्षीय महिला गुरुवारी सायंकाळी ७च्या सुमारास आॅटोरिक्षातून घरी जात होती. यावेळी तीन अनोळखी व्यक्ती तिच्या आॅटोत बळजबरीने बसले. त्यानंतर त्यांनी शेल्हाळ रोडवर नेऊन अत्याचार केले, असा जबाब पीडित महिलेने पोलिसांना दिला आहे. याबाबत शहर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्द गुन्हा दाखल करण्यात आला.