शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

विरोधकांना संपविण्याची वृत्ती घातक! देशाची प्रतिमा मलिन; हायकोर्टाने ओढले ताशेरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 04:40 IST

विरोधक व उदारमतवादी मूल्यांना संपविण्याची वाढती प्रवृत्ती धोकादायक असून त्यामुळे देशाची प्रतिमा मलिन होत आहे, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने बंगळुरूच्या ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचा हवाला देत गुरुवारी नोंदवले.

मुंबई : विरोधक व उदारमतवादी मूल्यांना संपविण्याची वाढती प्रवृत्ती धोकादायक असून त्यामुळे देशाची प्रतिमा मलिन होत आहे, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने बंगळुरूच्या ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचा हवाला देत गुरुवारी नोंदवले.डॉ. नरेंद्र दाभोलकर व गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी त्यांचे कुटुंबीय तसेच केतन तिरोडकर यांनी याचिका दाखल केल्या आहेत. त्यावरील सुनावणी न्या. एस. सी. धर्माधिकारी व न्या. भारती डांग्रे यांच्या खंडपीठापुढे झाली. केवळ विचारवंतच नव्हे तर उदारमतवादावर विश्वास ठेवणाºया व्यक्ती किंवा संस्थांनाही ‘लक्ष्य’ केले जाऊ शकते, अशी ही स्थिती असल्याचे निरीक्षण कोर्टाने नोंदविले. दाभोलकर व पानसरे हत्येप्रकरणी सीबीआय व एसआयटीने कोर्टात अहवाल सादर केला. त्यावर तपास यंत्रणांच्या हाती काही ठोस लागले नसल्याचे कोर्टाने नमूद केले.तुम्ही मेहनत घेत असाल तरी मुख्य आरोपी फरार आहेत, हे सत्य आहे. प्रत्येक सुनावणीनंतर एक मोलाचा जीव जाईल. दुर्दैवाने गेल्याच महिन्यात उदारमतवादी विचाराचा (गौरी लंकेश) एक जीव बंगळुरूमध्ये गेला. भविष्यात कोणाचा बळी जाणार नाही, याची काय हमी? आरोपी चलाख असल्याने तपासासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा, असे निर्देशही मुंंबई उच्च न्यायालयाने दिले.सनातन संस्थेच्या भूमिकेचा तपास न केल्याचा आरोप दाभोलकर व पानसरे कुटुंबीयांच्या वकिलांनी केला. मात्र न्यायालयाने तपास झाल्याचे सांगितले.

टॅग्स :Mumbai High Courtमुंबई हायकोर्टGovernmentसरकारBJPभाजपा