शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

बनावट सौंदर्य प्रसाधने व औषधांवर एफडीएची कारवाई

By admin | Updated: January 28, 2017 03:56 IST

अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए) मुंबईसह ठाणे, नाशिक, बुलढाण्यात बनावट सौंदर्य प्रसाधने आणि बनावट औषध साठ्यावर कारवाई केली

मुंबई : अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए) मुंबईसह ठाणे, नाशिक, बुलढाण्यात बनावट सौंदर्य प्रसाधने आणि बनावट औषध साठ्यावर कारवाई केली आहे. एफडीएच्या अधिकाऱ्यांना कुलाबा येथील सिप्ला या उत्पादकाकडे सेरोफ्लो इन्हेलर औषधाचा बनावट साठा असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, निर्मल रामचंद्र खतवानी यांच्याकडे चौकशी केल्यावर ३५ कंटेनर्स जप्त करण्यात आले. या कंटेनरवरील उत्पादन व मुदतबाह्य दिनांक, कोडनंबर यामध्ये तफावत आढळली आहे. याविषयी संबंधितांविरुद्ध प्रथम खबरी अहवाल दाखल केला आहे. तसेच ठाणे येथील मेघा एप्रिकॉट स्क्रब, वसंत जूंज हर्बल कॉस्मेटिक्स कॉ. व रामेश्वरम केमिकल या उत्पादकांचे विनापरवाना उत्पादित करण्यात येणारे जवळपास १० लाखांचे बनावट सौंदर्यप्रसाधने जप्त केली आहेत, याप्रकरणी पुढील तपास सुरु आहे. आक्षेपार्ह जाहिराती करणाऱ्या राजश्री ट्रेडर्सवर धाड टाकून १० लाख ५५ हजार रुपयांचा आयुर्वेदिक औषधांचा साठा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी, वसंतकुमार त्यागी याच्याकडून विविध आयुर्वेदिक औषधे, डायबेटिस, कॅन्सर, ओबेसिटी, ट्यूमर इ. आजारांकरिता दावा करणारी जप्त औषधांमध्ये अ‍ॅक्सिओम, या उत्पादकाचा खोटा दावा करुन विकली जाणारी औषधे सापडली. तर भिवंडीच्या कांचन फार्मा येथून औषधाच्या साठ्यात आक्षेपार्ह मजकूर आढळल्याने ६ लाख रुपयांचा साठा जप्त केला.बुलढाणा येथे मे.एस.व्ही. एंटरप्राईसेस या दुकानात बोगस ग्राहक पाठवून बनावट सौंदर्य प्रसाधनांची विक्री होत असल्याबद्दल धाड टाकली. या उत्पादकाकडे कोणताही परवाना नव्हता. वसंत भट्टी यांच्याकडून जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत सुमारे साडेतीन लाख आहे. तर नाशिक येथे सिप्ला कंपनीची औषधे विशेष सवलत दराने प्राप्त करुन घेऊन त्यांची खोटी मागणीपत्रे व बिले तयार करण्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. यात करवा फार्मास्युटिकल्स व चौधरी अँड कं यांचा सहभाग असल्याचे आढळले. त्यांनी सिप्ला कंपनीच्या वैद्यकीय प्रतिनिधींशी संगनमत करुन हा प्रकार केल्याचे आढळले. दोन्ही संस्थांविरुद्ध प्राथमिक नाहिती अहवाल दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)