कोल्हापूरमध्येही फॅब इंडियात सापडला छुपा कॅमेरा, कर्मचारी अटकेत

By Admin | Updated: April 4, 2015 17:26 IST2015-04-04T17:25:55+5:302015-04-04T17:26:21+5:30

गोव्यातील फॅब इंडियाच्या शोरूममधील छुपा कॅमे-याचे प्रकरण ताजे असतानाच कोल्हापूरमध्येही असाच प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी सेल्समनला अटक करण्यात आली आहे.

FBI found hidden camera in Kolhapur, employee detained | कोल्हापूरमध्येही फॅब इंडियात सापडला छुपा कॅमेरा, कर्मचारी अटकेत

कोल्हापूरमध्येही फॅब इंडियात सापडला छुपा कॅमेरा, कर्मचारी अटकेत

>ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. ४ - गोव्यातील फॅब इंडियाच्या शोरूममधील छुपा कॅमे-याचे प्रकरण ताजे असतानाच कोल्हापूरमध्येही असाच प्रकार उघडकीस आला आहे. चेजिंग रुममध्ये तरूणीचे लपून चित्रीकरण केल्याप्रकरणी शोरूममधील सेल्समन प्रकाश इस्पुर्ले याला पोलिसांनी अटक केली आहे. 
शाहुपूरी भागातील फॅब इंडियाच्या शोरूममध्ये एक तरूणी ३१ मार्च रोजी खरेदीसाठी गेली होती.  कपड्याची ट्रायल घेण्यासाठी ती चेंजिग रूममध्ये गेली असता त्या सेल्समनने दाराच्या फटीतून मोबाईलवर शूटिंग करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार त्या तरूणीच्या लक्षात आला असता तिने आरडाओरडा केला आणि व्यवस्थापकांकडे तक्रार केली. त्यानंतर शआहुपूरी पोलिस स्थानकात तक्रारही नोंदवली. त्यानंतर  पोलिसांनी आज त्या सेल्समनला अटक केली. 
या सर्व प्रकारांनंतर फॅब इंडिया संशयाच्या फे-यात अडकला आहे. कालच गोवा भाजपाच्या प्रभारी व केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी शुक्रवारी उत्तर गोव्यातील कांदोळी येथील ‘फॅब इंडिया’च्या चेंजिंग रूमवर लावलेला ‘छुपा कॅमेरा’ पकडल्याने मोठी खळबळ उडाली होती. खासगी कारणास्तव गोवा भेटीवर आलेल्या स्मृती इराणी शुक्रवारी कांदोळी येथील ‘फॅब इंडिया’च्या शोरूममध्ये गेल्या होत्या. तेथे त्यांना चेंजिंग रूमवर छुपा कॅमेरा बसविल्याचे आढळून आले.
मात्र खरेदीसाठी आलेले पर्यटक मौल्यवान वस्तू चोरून नेण्याची भीती असते. त्यामुळे काउंटरवर ‘छुपे कॅमेरे’ बसविलेले असतात, असे फॅब इंडियातर्फे सांगण्यात आले होते. 

Web Title: FBI found hidden camera in Kolhapur, employee detained

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.