FB वर पत्नीच्या मैत्रिणीचे खोटे प्रोफाईल बनवून बदनामी केल्याप्रकरणी तरूणाला अटक
By Admin | Updated: June 7, 2017 20:36 IST2017-06-07T20:36:37+5:302017-06-07T20:36:37+5:30
पत्नीच्याच मैत्रिणीचे खोटे प्रोफाईल तयार करून तिची बदनामी केल्याप्रकरणी सायबर सेलकडून तरूणाला अटक करण्यात आली आहे.

FB वर पत्नीच्या मैत्रिणीचे खोटे प्रोफाईल बनवून बदनामी केल्याप्रकरणी तरूणाला अटक
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 7 - पत्नीच्याच मैत्रिणीचे खोटे प्रोफाईल तयार करून तिची बदनामी केल्याप्रकरणी सायबर सेलकडून तरूणाला अटक करण्यात आली आहे. हडपसर पोलीस ठाण्यात तरूणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरेंद्र कुमार जैन ( वय 27 मूळ रा.जशननगर राजस्थान सध्या बोर्डेवस्ती, मोशी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिला ही पणजी येथे राहाते आणि ती जैन याच्या पत्नीची मैत्रीण आहे. विवाहाला तीन वर्षे झाल्यानंतर पत्नी विभक्त झाली.
दोघांना एक मुलगा देखील आहे. मात्र दोघांचा अद्यापही घटस्फोट झालेला नाही. याच मैत्रिणीने पत्नीला नोकरी लावताना तिचे स्टेटस सिंगल दाखविल्याचा त्याला राग आला म्हणून जैन याने या महिलेचे फेसबुकवर खोटे प्रोफाईल तयार केले . त्यावर तिचा आणि तिच्या मित्राचा फोटो टाकून त्याखाली मोबाईल नंबरसहित अश्लील मजकूर टाकला. अचानक महिलेला रात्रीअपरात्री अज्ञात व्यक्तींचे फोन येऊ लागल्याने ती जरा बुचकळ्यातच पडली..एके दिवशी मैत्रिणीच्या मित्राने ते पाहिल्यानंतर त्याला धक्काच
बसला आणि त्याने सायबर सेल विभागाकडे तक्रार दिली. त्यावरून तरूणाला अटक करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक नितीन खामगळ यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी योगेश वाव्हळ, नितीन चांदणे, अस्लम आत्तार, तोसीफ मुल्ला, संतोष जाधव यांनी ही कामगिरी केली.