मुलाला खेळणी घेण्यावरून पित्याची आत्महत्या !
By Admin | Updated: May 20, 2016 19:18 IST2016-05-20T19:18:39+5:302016-05-20T19:18:39+5:30
आपल्या लाडक्या मुलाला खेळणी घेण्याच्या कारणावरून पती-पत्नीमध्ये पेटलेला वाद एवढा विकोपाला गेला की संतप्त पतीने नैराश्येच्या भावनेत विषप्राशन करून आत्महत्या केली.

मुलाला खेळणी घेण्यावरून पित्याची आत्महत्या !
ऑनलाइन लोकमत
सातारा, दि. २० : आपल्या लाडक्या मुलाला खेळणी घेण्याच्या कारणावरून पती-पत्नीमध्ये पेटलेला वाद एवढा विकोपाला गेला की संतप्त पतीने नैराश्येच्या भावनेत विषप्राशन करून आत्महत्या केली. सातारा तालुक्यातील पोगरवाडी येथे ही विचित्र घटना घडली.
याबाबतची अधिक माहिती अशी की, सतीश मनोहर घोरपडे ( वय ३२ ) यांना १० वर्षांचा मुलगा आहे. या मुलाला खेळणी आणण्यावरुन काल पती-पत्नीमध्ये कुरबुर सुरु झाली. त्यानंतर हा वाद एवढा टोकाला गेला की रागाच्या भरात झाला गुरुवारी रात्री सतीश घरातून निघून गेले.
आज त्यांचा मृतदेह घराजवळच असलेल्या शेतात सापडला. विष पिऊन त्यांनी आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. केवळ एका किरकोळ कारणावरून घरातील कर्त्या पुरुषाने जीव दिला, हे समजताच गावात प्रचंड हळहळ व्यक्त करण्यात आली.