दोन मुलांचा खून करून पित्याची आत्महत्या

By Admin | Updated: January 6, 2015 02:09 IST2015-01-06T02:09:28+5:302015-01-06T02:09:28+5:30

दोन निरागस चिमुकल्यांचा खून करून हाताच्या नसा कापून घेत झाडाला फाशी घेऊन पित्याने आत्महत्या केल्याचा खळबळजनक प्रकार औरंगाबादेत सोमवारी सकाळी उघडकीस आला़

The father's suicide by killing two children | दोन मुलांचा खून करून पित्याची आत्महत्या

दोन मुलांचा खून करून पित्याची आत्महत्या

औरंगाबाद : दोन निरागस चिमुकल्यांचा खून करून हाताच्या नसा कापून घेत झाडाला फाशी घेऊन पित्याने आत्महत्या केल्याचा खळबळजनक प्रकार औरंगाबादेत सोमवारी सकाळी उघडकीस आला़ पत्नीच्या चारित्र्यावरील संशयावरून आलेल्या नैराश्यातून या निष्ठुर पित्याने हे टोकाचे पाऊल उचल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
राम अहीर (४५) असे या पित्याचे नाव असून वीर (८) आणि अंशुमन (५) दोन दुर्दैवी मुलांची नावे आहेत. राम वेल्ंिडगच्या दुकानात काम करून आपली उपजीविका भागवीत होता. पती, पत्नी, चार मुली आणि दोन मुले, असे त्याचे कुटुंब. त्याच्या दोन मुली विवाहित आहेत. एक अविवाहित मुलगी एका आश्रमात राहते. एक मुलगी, पत्नी आणि दोन चिमुकल्या मुलांसह राम चौधरी कॉलनीतील गोरखनगरमध्ये भाड्याच्या खोलीत राहत होता. रामला पत्नी ज्योतीच्या चारित्र्यावर संशय होता. दोन आठवड्यांपूर्वी या दोघांमधील वाद विकोपाला गेला. तेव्हा ज्योती ही एका मुलीला घेऊन याच परिसरात राहणाऱ्या आईकडे वास्तव्यास गेली. वीर व अंशुमनला रामने आपल्याकडेच ठेवले. तो घरी नसताना ही मुले दिवसा आईकडे जात. सायंकाळी पुन्हा वडिलांकडे येत. सोमवारी सकाळी चिकलठाणा बाजारतळाजवळच लिंबाच्या झाडाखाली एक व्यक्ती पडलेला असल्याचे तेथून जाणाऱ्या एकाच्या नजरेस पडले. काय झाले पाहण्यासाठी राम अहिरचा पुतण्याही तेथे पोहोचला असता हा प्रकार उघडकीस आला. रामच्या हाताच्या नसा कापलेल्या होत्या. त्याने लिंबाच्या झाडाला फाशी घेतल्यानंतर फांदी तुटल्याने तो खाली पडला होता; परंतु तोपर्यंत त्याला फास बसल्याने त्याचा मृत्यू झाला होता. (प्रतिनिधी)


चिठ्ठीत दोघांची नावे
रामने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत दोन जणांची नावे लिहून ठेवलेली आहेत. त्यातील एक जण दूध विक्रेता असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. या दोघांचे आपल्या पत्नीसोबत संबंध असल्याचा रामचा संशय होता, असे सूत्रांनी सांगितले. त्या दिशेने पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Web Title: The father's suicide by killing two children