पित्यासह भावाचा खून करून युवकाची आत्महत्या
By Admin | Updated: July 10, 2014 01:11 IST2014-07-10T01:11:36+5:302014-07-10T01:11:36+5:30
आईवडिलांच्या संमतीने लग्न करून घरात आणलेली मुलगी पसंत नसल्याचा राग आणि त्यातून नेहमी उडणा:या खटक्यांमुळे अखेर एका परिवारातील बापलेकांचा दुर्दैवी अंत झाला. स

पित्यासह भावाचा खून करून युवकाची आत्महत्या
गोंदियातील थरार : प}ी पसंत नसल्याने काढला राग
गोंदिया : आईवडिलांच्या संमतीने लग्न करून घरात आणलेली मुलगी पसंत नसल्याचा राग आणि त्यातून नेहमी उडणा:या खटक्यांमुळे अखेर एका परिवारातील बापलेकांचा दुर्दैवी अंत झाला. सकाळी झोपेतून उठत असलेले वडील आणि लहान भावाच्या डोक्यात लोखंडी रॉडचे घाव घालून मोठय़ा भावाने त्यांना यमसदनी धाडले आणि त्यानंतर त्याने खोलीत जाऊन गळफास घेत आत्महत्या केली.
हा थरार बुधवारी सकाळी 7.3क् च्या सुमारास गोंदियाच्या सुंदरनगर भागात घडला. मदन चिमण मेश्रम (5क्) व विकास (22) अशी खून झालेल्या बापलेकांची नावे आहेत, तर गणोश (25) असे आत्महत्या करणा:या आरोपीचे नाव आहे.
गणोशचे लग्न गोरेगाव तालुक्याच्या कवलेवाडा येथील सरिता हिच्याशी दोन वर्षापूर्वी झाले होते. परंतु सरिता पसंत नसल्याने तो नेहमीच तिच्याशी वाद घालत होता. तिचा रंग सावळा असल्याने तो तिला नेहमी माहेरीच पाठवायचा. आई-वडिलांनी त्याचे तिच्याशी लग्न करून दिल्यामुळे तो त्यांच्यावर नाराज असायचा. सरिताचे वडील व इतर चार जण मंगळवारी दुपारी 12 वाजताच्या दरम्यान गणोशच्या घरी बैठक करण्यासाठी आले होते.
भाऊ प्रकाशने दोघांना केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. परंतु डॉक्टरांनी त्या दोघांना मृत घोषित केले. पोलिसांच्या वाहनाने ते घरी गेल्यावर गणोशची खोली आतून बंद होती. दाराला धक्का दिल्यावर गणोश गळफास घेतलेल्या स्थितीत आढळला.