शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
2
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
3
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
4
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
5
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
6
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
7
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
8
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
9
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
10
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
11
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
12
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
13
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
14
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
15
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!
16
Video: "मी कॅमेऱ्यावर कसं सांगू, ते वैयक्तिक..."; ब्ल्यू प्रिंटवर भाजपा उमेदवाराचं उत्तर व्हायरल
17
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
18
उल्हासनगर महापालिका कलानी मुक्त करणार; भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश वधारियांचा इशारा
19
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
20
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल

बापाची माहिती लपविली; काकाच्या पुराव्यांवर व्हॅलिडिटी मिळविली, कोर्टाच्या डोळ्यात धूळफेक, जातचोरीसाठी केला प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2024 10:30 IST

Court News: जातचोरी करण्यासाठी दोन्ही मुलांनी वडिलांची माहिती दडवून काकांचा व्हॅलिडिटीचा पुरावा जोडून व्हॅलिडिटी मिळविल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.

- गणेश वासनिकअमरावती - जातचोरी करण्यासाठी दोन्ही मुलांनी वडिलांची माहिती दडवून काकांचा व्हॅलिडिटीचा पुरावा जोडून व्हॅलिडिटी मिळविल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. अमरावती येथील आदिवासी विकास विभागाच्या अधिनस्थ अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीने किरण तोरडमल यांचे जात प्रमाणपत्र रद्द केले होते. असे असताना त्यांच्या दोन्ही मुलांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फेटाळलेल्या याचिकेची माहिती दडवून ठेवत जातचोरीसाठी चक्क काका रवींद्र यांचा व्हॅलिडिटीचा पुरावा जोडून व्हॅलिडिटी मिळविली. पीयूष किरण तोरडमल व आयुष किरण तोरडमल अशी त्यांची नावे आहे.

पीयूष हा जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे कार्यरत आहे. तर आयुष हा यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील पोस्ट ऑफिसमध्ये कार्यरत आहे. ही दोन्ही भावंडे अनुसूचित जमातीच्या राखीव जागेवर कार्यरत आहेत. अमरावती येथील आदिवासी विकास विभागाच्या अधिनस्थ अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीने किरण एकनाथ तोरडमल यांचा 'कोळी महादेव' या अनुसूचित जमातीचा दावा २७ जानेवारी २००३ रोजी अवैध ठरवला होता. ही माहिती त्यांचा सख्खा भाऊ रवींद्र एकनाथ तोरडमल यांनी अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती संभाजीनगरपासून लपवून 'कोळी महादेव' जमातीची व्हॅलिडिटी मिळविल्याची घटना 'लोकमत'ने उघडकीस आणली होती.

संभाजीनगर हायकोर्टाचे व्हॅलिडिटीचे आदेशपीयूष व आयुष या दोन भावंडांनी अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती किनवट मुख्यालय संभाजीनगर यांचेकडे 'कोळी महादेव' जमातीचा दावा पडताळणीसाठी दाखल केला होता. या दोघांचाही दावा समितीने ७ ऑक्टोबर २०२४ रोजी नाकारला होता. या निर्णयाविरुद्ध त्यांनी रिट याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने किनवट समितीचा निर्णय १६ ऑक्टोबर २०२४ रोजी रद्द ठरवून या दोघांना सशर्थ व्हॅलिडिटी देण्याचे आदेश दिले.

वडिलांची याचिका हायकोर्टाने फेटाळली होतीपीयूष आणि आयूष यांचे वडील किरण एकनाथ तोरडमल यांचे 'कोळी महादेव' जमातीचे जातप्रमाणपत्र आर.सी. नंबर ९०६ / एमआरसी-८१/८७-८८ पुसद हा दावा अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, अमरावती यांनी २७ जानेवारी २००३ रोजी नाकारला होता. या निर्णयाविरुद्ध त्यांनी उच्च न्यायालय मुंबई, खंडपीठ नागपूर येथे रिट याचिका क्र.१२८८/ २००३ दाखल केली होती. उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावत अमरावती समितीचा निर्णय कायम ठेवला, हे विशेष.

टॅग्स :Courtन्यायालयchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर