चिमुकलीला पित्याने आदळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2017 03:05 IST2017-02-15T03:05:35+5:302017-02-15T03:05:35+5:30

खर्च करण्यासाठी पैसे का देत नाही, या कारणावरून पत्नीला लोखंडी फुकणीने बेदम मारहाण करीत निर्दयी पित्याने तीन वर्षीय

Father chimukkela was rebuked by father | चिमुकलीला पित्याने आदळले

चिमुकलीला पित्याने आदळले

गोरेगाव (जि. हिंगोली) : खर्च करण्यासाठी पैसे का देत नाही, या कारणावरून पत्नीला लोखंडी फुकणीने बेदम मारहाण करीत निर्दयी पित्याने तीन वर्षीय चिमुकलीच्या पायाला धरून जमिनीवर आदळले. त्यात तिचा ११ फेब्रुवारीला उपचारादरम्यान मृत्यू झाला.
म्हाळशी येथील रेणुकाबाई पांढरे मोलमजुरी करतात. जेवणानंतर शुक्रवारी रात्री त्या मुलीसोबत घरात झोपल्या होत्या. रात्री पती विश्वनाथ आला. खर्च करण्यासाठी मजुरीचे पैसे का देत नाही, म्हणून रेणुकाशी त्याने वाद घातला. लोखंडी फुंकणीने रेणुकाला त्याने बेदम मारहाण केली. रागाच्या भरात तीन वर्षीय मुलगी ईश्वरीचे दोन्ही पाय धरून त्याने तिला जमिनीवर आपटले. जबर दुखापतीमुळे ती बेशुद्ध पडली. हा प्रकार कोणास सांगितला तर जिवे मारून टाकीन, अशी धमकी देत पत्नी व मुलीस त्याने घरामध्ये डांबून ठेवले. विश्वनाथ पांढरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. (वार्ताहर)

Web Title: Father chimukkela was rebuked by father