दारु पिऊन पिता पुत्रास मारहाण: महिलेचेही मंगळसूत्र हिसकावले
By Admin | Updated: July 19, 2016 22:09 IST2016-07-19T22:09:40+5:302016-07-19T22:09:40+5:30
पूर्ववैमनस्यातून दारुच्या नशेतच शेजारच्या पिता-पुत्राला मारहाण करुन भांडण सोडविणाऱ्या महिलेचेही मंगळसूत्र हिसकावणाऱ्या शाहीन कुरेशी, मेहरोज कुरेशी आणि नदीम कुरेशी

दारु पिऊन पिता पुत्रास मारहाण: महिलेचेही मंगळसूत्र हिसकावले
ठाणे : पूर्ववैमनस्यातून दारुच्या नशेतच शेजारच्या पिता-पुत्राला मारहाण करुन भांडण सोडविणाऱ्या महिलेचेही मंगळसूत्र हिसकावणाऱ्या शाहीन कुरेशी, मेहरोज कुरेशी आणि नदीम कुरेशी या तिघांना राबोडी पोलिसांनी अटक केली आहे. तिघांनाही न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
शाहीन याने १८ जुलै रोजी पहाटे १.३० वा. च्या सुमारास रुक्साना मेमन यांच्या मुलाला आणि पती फिरोज मेमन यांना विनाकारण शिवीगाळ केली. तर मेहरोज आणि नदीम यांनी मेमन यांच्या घरात शिरकाव करुन रुक्साना हिचेही मंगळसूत्र हिसकावले तसेच तिचे कपडेही फाडले. कहर म्हणजे याबाबत पोलिसांकडे तक्रार दिल्यास या कुटुंबाला ठार मारण्याची धमकीही कुरेशी यांनी दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच तिन्ही कुरेशी बंधूंना अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक काशीनाथ चव्हाण यांनी दिली.