फत्तेहसिंह पाटील यांची बदली तडकाफडकी रद्द
By Admin | Updated: August 15, 2015 00:17 IST2015-08-15T00:17:35+5:302015-08-15T00:17:35+5:30
हुंड्यासाठी छळाच्या आरोपाप्रकरणी बहुचर्चित राधे माँ यांच्याविरुद्ध आणि मालवणीतील प्रेमी युगुलांच्या मागे ससेमिरा लावल्याच्या घटनेची चौकशी करणारे अतिरिक्त पोलिस आयुक्त फत्तेहसिंह पाटील

फत्तेहसिंह पाटील यांची बदली तडकाफडकी रद्द
मुंबई : हुंड्यासाठी छळाच्या आरोपाप्रकरणी बहुचर्चित राधे माँ यांच्याविरुद्ध आणि मालवणीतील प्रेमी युगुलांच्या मागे ससेमिरा लावल्याच्या घटनेची चौकशी करणारे अतिरिक्त पोलिस आयुक्त फत्तेहसिंह पाटील यांची शुक्रवारी सकाळी तडकाफडकी उचलबांगडी करुन नांदेडला बदली करण्यात आली. परंतु अनेक थरांतून टीका झाल्यानंतर अणि विशेष म्हणजे स्वत: पोलीस आयुक्तांनीच हस्तक्षेप केल्यानंतर पाटील यांची ही बदली तेवढ्याच घाईगर्दीने सायंकाळी रद्दही केली.
गुरुवारी रात्रीच गृह खात्याने पाटील यांच्या बदलीचा आदेश जारी करीत त्यांची तात्काळप्रभावाने नांदेड येथे पोलिस उप-महानिरीक्षक म्हणून रवानगी केली होती. आम्ही ही बदली रद्द करण्याची सरकारला विनंती केली व ती मान्य करण्यात आली, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले.
अडीच महिन्यापूर्वीच मुंबईत आलेल्या फत्तेहसिंह पाटील यांनी हा निर्णय आश्चर्यकारक आणि धक्कादायक असल्याचे ‘लोकमत’ला दुपारी सांगितले होते. संध्याकाळी बदली रद्द झाल्याचे कळल्यावर ते म्हणाले, मी माझे काम जोमाने करीत होतो. राधेमाँला उच्च न्यायालयाने अटकेपासून दोन अठवड्यांचा दिलासा दिल्यानंतर लगेच अम्ही तिचे जाजबजबाही नोंदविले. पुढील कारवाईविषयी आम्ही कायदा सल्लागारांश्ी सल्ला-मसलतही केली. महत्त्वाची प्रकरणे हाताळत असताना तडकाफडकी बदली करणे बेकायदेशीर ठरले असते, असेही पाटील म्हणाले. पाटील यांनी सांगितले की, अडीच महिन्यापूर्वीच मी मुंबईत आलो. फिल्म सिटीमधील गोळीबारप्रकरणाचा दोनच दिवसांत छडा लावला. मालवणीतील गावठी दारूकांडाचा तपास दिवस-रात्र केला. अलीकडेच त्यांनी उत्तर मुंबईतील काही हॉटेलांवर धाडी घालून अश्लील चाळे करणाऱ्या काही जोडप्यांनाही कायद्याचा बडगा दाखविला होता. काही पोलिस कर्मचारी गैरवर्तन करताना आढळले होते.
माजी आयपीएस अधिकारी वाय. पी. सिंह यांनीही यांनीही महाराष्ट्र सरकार सेवक कायद्याचा दाखला देत पाटील यांची बदली बेकायदेशीर असल्याचे म्हटले म्हटले होते. ते काही महत्त्वाची प्रकरणे हाताळीत असताना त्यांची तडकाफडकी बदली केल्याने समाजात चुकीचा संदेश गेला असता, असेही सिंह म्हणाले.
नांदेड कोणालाही नको
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, आयजीपी पदावरील कोणत्याही अधिकाऱ्याला नांदेडला जाण्याची इच्छा नाही. कारण हे पद आयजीपी पदापेक्षा खालच्या दर्जाचे आहे. महाराष्ट्र दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आहे. नांदेडवरही दहशतवाद्यांची नजर आहे. पाटील यांनी तेथे काही वर्षे घालविली आहेत.
तेव्हा एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याची त्या ठिकाणी बदली करणे जरुरी होते. पाटील यांना त्या भागाची माहिती असल्यानेच त्यांची नांदेडला बदली करण्यात आली होती. पण आता तेही तेथे जाणार नाहीत.