अनैतिक संबंधातून प्राणघातक हल्ला

By Admin | Updated: April 30, 2016 03:34 IST2016-04-30T03:34:58+5:302016-04-30T03:34:58+5:30

पामटेंभी येथे राहणाऱ्या राजु ब्रिजनंदन पटेल (४५) याने रामलखन सिंग यांच्यावर चाकुने केलेल्या प्राणघातक हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला

Fatal Attack From Immoral Relations | अनैतिक संबंधातून प्राणघातक हल्ला

अनैतिक संबंधातून प्राणघातक हल्ला

पालघर : अनैतिक संबंधाच्या प्रकरणावरून झालेल्या बाचाबाचीनंतर पामटेंभी येथे राहणाऱ्या राजु ब्रिजनंदन पटेल (४५) याने रामलखन सिंग यांच्यावर चाकुने केलेल्या प्राणघातक हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी सातपाटी सागरी पोलीसांनी आरोपीला अटक केली आहे.
सातपाटी सागरी पोलीस स्टेशन अंतर्गत पाम टेंभी येथील एका चाळीत राहणाऱ्या आरोपी राजु पटेल यांचे शेजारी राहणाऱ्या एका विवाहीत महिलेशी अनैतिक संबंध होते. त्यावरून त्याचे आपल्या बायकोशी नेहमीच कडाक्याचे भांडणे होत असत. दिनांक २२ एप्रिल रोजी रात्रौ ८ वाजून ४५ मिनिटांनी या दोन्ही पती-पत्नीमध्ये कडाक्याचे भांडण सुरू झाल्यानंतर शेजारी राहणारा त्याचा मित्र रामलखन सिंग त्यांचे भांडणात मध्यस्थी करण्यासाठी मध्ये पडला. याचवेळी रागाने बेफाम झालेल्या आरोपी राजु पटेल यांनी घरात भाजी कापण्यासाठी पडलेली सुरी घेऊन रामलखन याच्यावर सपासप वार केले आणि तो पळून गेला. त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला मात्र तो पसार झाला.
या प्रकरणी तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक एच ढोकले यांनी अधिक तपास करून पाम येथे एका निर्मनुष्य भागात लपुन बसलेल्या आरोपीला पकडण्यात यश मिळविले. पोलीसांनी भादवी कलम ३०७ अन्वये खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली. (वार्ताहर)

Web Title: Fatal Attack From Immoral Relations