मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 10:25 IST2017-07-21T09:36:10+5:302017-07-21T10:25:50+5:30
मुंबई- अहमदाबाद महामार्गावरील कुडे या ठिकाणी दोन मोठ्या कंटेनरमध्ये अपघात झाला आहे

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात
ऑनलाइन लोकमत
पालघर, दि. 21- मुंबई- अहमदाबाद महामार्गावरील कुडे या ठिकाणी दोन मोठ्या कंटेनरमध्ये अपघात झाला आहे. या अपघातात दोन्ही वाहनानी पेट घेतला आहे. या अपघातात पाठीमागून टक्कर दिलेल्या वाहन चालकाचा जळुन मृत्यु झाला असल्याची माहिती मिळते आहे. ही घटना शुक्रवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास घडली आहे. वाहन चालकाला झोप लागल्याने अपघात झालला असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. दरम्यान, फायर ब्रिगेडसध्या घटनास्थळी आहे. महामार्गावर आग विझविण्यासाठी कोणतीही यंत्रणा उपलब्ध नसल्याने बराच वेळ महामार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता.
या अपघातामुळे मुंबई-अहमदाबाद महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. मार्गावरील एकेरी वाहतूक सध्या सुरू करण्यात आली आहे. अपघात झाला त्यावेळी सकाळी दोन्ही बाजूंच्या वाहतुकीवर परिणाम झाला होता. त्यामुळे महामार्गावर पाच ते सहा किमीपर्यंत वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. दरम्यान, काही वेळात वाहतूक पुर्वपदावर येणार असल्याची माहिती मिळते आहे.